शहरात खुनांचे सत्र थांबेना ; टोळक्याने केला तरुणाचा निर्घृण खून ! - CHECKMATE NEWS
क्राईम

शहरात खुनांचे सत्र थांबेना ; टोळक्याने केला तरुणाचा निर्घृण खून !


चाकू, तलवारी हातात घेत चारचाकी वाहनांची तोडफोड !
संपूर्ण शहराला गुन्हेगारांनी वेठीस धरल्याचे दुर्दैवी चित्र !
नाशिक : नाशिकमधील गुन्हेगारी बिहारपेक्षा पुढे गेली असल्याचे दिवसाआड होणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे जाणवू लागले आहे. पांडवलेणी परिसरात किरकोळ भांडणाच्या वादातून एका टोळक्याने चाकू आणि तलवारीने हल्ला करीत एका युवकाचा निर्घृण केला आहे. तर या प्राणघातक झालेल्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनांच्या मालिकांमुळे नाशिक शहर गुन्हेगारांनी वेठीस धरल्याचे चित्र दिसू लागल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाविषयी आपला संताप व्यक्त केला आहे. 
           गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात खुनाची मालिका सुरु आहे. भर रस्त्यात किरकोळ कारणावरून एकमेकांचे मुडदे पाडले जात आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नसल्यानेच गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे. शहरात पोलिसांचा धाक राहिला नसल्यानेच गुन्हेगारांनी आपले डोके वर काढले असून, दिवसाढवळ्या गंभीर गुन्हे घडू लागल्याने नाशिक बिहारपेक्षाही पुढे गेल्याची चर्चा चौकाचौकात रंगू लागली आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक कधी ठोस भूमिका घेऊन रस्त्यावर उतरत गुन्हेगारी मोडीत काढणार असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे. 
              रविवार दि. १३ रोजी रात्री दहा साडेदहा वाजेच्या सुमारास ज्ञानपीठ सोसायटीसमोर पांडवलेणी जवळ येथे फिर्यादी साहिल राजन सिंग, २०, रा. संभाजी स्टेडियमच्या पाठीमागे ब्रम्हाणी बिल्डिंगच्या जवळ शालिनीताई बोरसे शाळेच्या बाजूला सिडको, अंबड, नाशिक, रामदास नारायण बोराडे, २०, रा. ढेमसे मळा, राजेश सुदाम बोराडे, २०, रा. ज्ञानगंगा सोसायटी, पांडवलेणी जवळ, नाशिक आणि संशयित आरोपी शौकत फरीद शेख, १९, रा. पांडवलेणी पायथा, नौशाद हाजी सय्यद, १९, रा. सिन्नर, नफीस शेख उर्फ नफ्या, विजय सुनील माळेकर, १९, रा. पाथर्डी फाटा, दामोदर चौक, प्रिन्स उर्फ पियुष चंद्रकांत पालवे, रा. एकता कॉलनी, पांडवलेणी, रोहित चंद्रकांत पालवे, १८, रा. एकता सोसायटी मागे पांडवलेणी, नितीन विठ्ठल घुगे, १९, नरहरी लॉन्स, नवले चाळ, पाथर्डी फाटा, नाशिक, राहुल राकेश कुंभार आणि त्यांचे इतर साथीदार पूर्ण नाव पत्ता माहीत नाही. यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणादरम्यान संशयित आरोपी शौकत याने त्याच्या जवळील सुरा काढून इन को छोडो मत मार डालो अशी चिथावणी दिल्याने संशयित आरोपी विजय माळेकर याने त्याच्या कमरेला लावलेला सुरा काढून रामा बोराडे यांचे कंबरेवर वार करून त्याला ठार मारले. तसेच संशयित आरोपी शौकत व रोहित याने त्याच्याजवळ असलेल्या सुऱ्याने राजेश याच्यावर वार करून त्यास गंभीर जखमी केले. तर संशयित आरोपी नफ्या व नितीन घुगे यांनी त्याच्याजवळील असलेल्या तलवारी जोर जोराने फिरवून तेथे उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजवली. आणि संशयित आरोपी प्रिन्स पालवे यांनी त्याच्या हातात असलेली काचेची बॉटल फिर्यादी साहिल सिंग यांच्या तोंडवर मारत जखमी केले. यावेळी संशयित नौशाद व राहुल कुंभार यांनी सर्वांना लाथा बुक्क्यांनी हवी तशी मार हाण करीत हत्या केली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
सध्या नाशिक शहरात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांनी संपूर्ण शहराला वेठीस धरल्याचे चित्र दिसू लागले आहे. सामान्य महिलांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अगदी अंगणात उभ्या असलेल्या महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे घेऊन चोरटे दिवसाढवळ्या फरार होत आहे. तर दुसरीकडे दुचाकी चोरांनी शहरात अक्षरशः आपला उच्छाद मांडल्याने लाखो रुपयांच्या दुचाकी दररोज शहरातून चोरीस जाऊ लागल्या आहे. तर, कामानिमित्त घराबाहेर पडल्यास घरफोडी होत असल्याने नागरिकांची सर्रास लूट सुरु असल्याचे दुर्दैवी चित्र शहरात दिसत आहे. त्यामुळे शहराची वाटचाल बिहारच्या पुढे गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना शहरातील वाढलेली गुन्हेगारी दिसत नाही का असा प्रश्न नाशिककरांकडून विचारला जाऊ लागला आहे. तसेच, थेट पोलीस प्रशासनात सुरु झालेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे पतन करण्याचे मोठे आव्हान कर्णिक यांच्यासमोर उभे ठाकले असल्याचे दिसत आहे. यावर पोलीस आयुक्त काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Translate »
error: Content is protected !!