दोन महिलांसह सात संशयितांनी केला युवकाचा खून ! - CHECKMATE NEWS
क्राईम

दोन महिलांसह सात संशयितांनी केला युवकाचा खून !


लहान मुलांच्या भांडणावरून एका युवकाचा निर्घृण खून !
खुन करणाऱ्या संशयितांमध्ये दोन महिलांचा समावेश !
नाशिक : पंचवटी परिसरात रविवारी एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून हा खून करण्यात आल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी दिली आहे. या खुनातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खूनप्रकरणात दोन महिलांचा देखील समावेश असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे. 
           याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, विशांत राजाराम भोये, २४, रा. बिडी कामगार नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळ याने लहान मुलांच्या झालेल्या भांडणावरून मछिंद्र जाधव याच्या मुलाला मारले होते. याचाच राग डोक्यात ठेवून संशयित रेखा मोहिते, मछिंद्र जाधव, मंदा जाधव, नितीन पवार, सुरज मोहिते, गोरख जाधव यासह एका अल्पवयीन संशयित यांनी रविवार दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास विशांत भोये याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विशांतच्या अंगावर धारदार चाकूने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 
            या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले. तर इतर फरार झालेल्या संशयितांच्या मागावर पोलीस पथके पाठवली आहे. खुनाच्या या घटनेमुळे बिडी कामगार नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांचा धाक उरला नसल्यानेच शहरात अशा प्रकारे खुनाच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

Translate »
error: Content is protected !!