गुन्हेगाराकडून शिवजयंतीसाठी पाच लाखाच्या खंडणीची मागणी ! - CHECKMATE NEWS
क्राईम

गुन्हेगाराकडून शिवजयंतीसाठी पाच लाखाच्या खंडणीची मागणी !


पाच लाख दिले नाहीतर किरण निकम पेक्षा बेहत्तर मारण्याची धमकी ! 
पोलीस संशयिताला मदत करीत असल्याचा नातेवाईकांचा आरोप !
नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे सराईत गुन्हेगार टोळीयुद्ध करून थेट गोळीबार करीत आहे. या गुन्हेगारांवर पोलिसांचा अंकुश राहिला नसल्याने आता पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराने शिवजयंतीसाठी पाच लाख रुपये दिले नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील या सराईताने धमकी दिली असता पंचवटी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने या गुन्हेगाराने थेट मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप फिर्यादीच्या नातेवाईकांनी केला आहे. 
          सागर सुधाकर पगारे, ३०, रा. पेठ रोड फुले नगर, पंचवटी नाशिक याने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे कि, त्याच्या घराशेजारी राहणारा संशयित सागर जाधव याने बुधवार दि. ५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी अकरा हजार रुपये वर्गणी कधी देणार असल्याचे विचारले. तसेच, वर्गणी व्यतिरीक्त डेकोरेशन करिता वैयक्तीक पाच लाख रुपये दयावे लागतील असे म्हणल्याने मी त्याला माझे कडे एवढे पैसे नाही, मी का बर एवढे पैसे देवु, मी पैसे देणार नाही, असे म्हणलो असता संशयित सागर मला म्हणाला की, का बर देवू ? असे विचारायचे नाही, तुला मार्केट यार्डात दुकान लावायचे आहे की नाही ते सांग अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून दोन दिवसांत जमले तर करतो असे म्हणुन फिर्यादी सागर पगारे तेथुन निघुन आलो. त्यानंतर सागरने गुरुवार दि. ६ रोजी संशयित सागर जाधव याच्याविरुध्द शिवीगाळ व दमदाटी केल्याबद्दल अदखलपात्र तकार पंचवटी पोलीस ठाण्यात केली होती.  
           या घटनेची माहिती संशयित सागर जाधव याला मिळताच त्याने त्यानंतर शुक्रवार दि. ७ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सागर जाधव याने घराबाहेर येऊन माझ्या नावाची कम्प्लेंट करतो का ? कंम्प्लेट मागे घे, नाहीतर तुला मारून टाकेल, किरण निकम याला जसे मारले त्याच्या पेक्षाबेहतर तुला मारेल अशी पुन्हा धमकी दिली. तसेच त्याच्या सोबत असलेल्या आणि चेहऱ्याला रूमाल बांधलेल्या एका संशयिताने धमकी दिली की, कारे भाई विरूध्द कम्प्लेंट देतो का, तु जर कम्प्लेट मागे नाही ना घेतली तर मार्केटला येवुन दाखव तुला ठारच मारतो. त्यामुळे घाबरलेल्या सागर पगारे याने पुन्हा पंचवटी पोलीस ठाणे गाठून संशयित सागर जाधव विरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 
सागर पगारे यांच्या नातेवाईकांनी पोलिसांविषयी आपला संताप व्यक्त करीत अदखलपात्र गुन्हा दाखल केला तेव्हाच संशयित सागर जाधव याच्यावर कारवाई केली असती. तर त्याने पुन्हा खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली नसती. तसेच, पोलीस हे जाधव याला पकडण्याऐवजी त्याला अटकपूर्व जामीन करण्यासाठी मदत करत असल्याचा देखील आरोप केला आहे. त्यामुळे पंचवटी पोलीस संशयित सागर जाधव याला बेड्या ठोकणार का जाधव अटकपूर्व जामीन मिळविण्यात यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Translate »
error: Content is protected !!