पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याने युवकाची आत्महत्या ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याने युवकाची आत्महत्या !


दोन महिलांसह युवकावर गुन्हा दाखल !
नाशिक : सिडको परिसरातील युवकाला पैसे उसनवार देऊन पैशासाठी तगादा लावत ब्लॅकमेल केल्याने एका युवकाने टोकाचे पाऊल उचलत थेट आत्महत्या केली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन महिलांसह एका युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आत्महत्या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मयत युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवल्याने या सर्व प्रकार उघड झाला आहे. 
            याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी रोशन बाळासाहेब कुयटे,२२, रा. कार्तिक रोहाउस नं ३ कार्तिकीय नगर खुटवडनगर नाशिक यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊ ललित बाळासाहेब कुयटे, २३ हा सध्या ४ महिन्यापासून घरीच होता. मंगळवार दि. १ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ललित हा उठला नाही म्हणून वरील रूममध्ये बघण्यास गेले असता रूमचा दरवाजा हा आतुन लावला असल्याने शेजारील गॅलरीत जावुन खिडकीतुन डोकावून बघितले असता ललित याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आला.
            याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता मयत ललित यांच्या खिश्यात एक चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीमध्ये ललित याने जिज्ञासा पाटील नवरे व तिचा मित्र ओंकार शिंदे हे ब्लॅकमेल करून माझा भावाकडुन वारंवार पैशाची मागणी करत असल्याचे आणि मोना नावाच्या मुलीकडे माझी रेकॉर्डिग असल्याने ती पण पैशांची मागणी करीत असल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. 
मयत ललित याने जिज्ञासा पाटील हिला ९० हजार रुपये द्यायचे होते. त्यातील ४० हजार रुपये यापूर्वी दिले होते. मात्र, यातील संशयित जिज्ञासा पाटील, ओंकार शिंदे आणि मीना यांनी मिळून ललित याला अनेक प्रकारे त्रास देण्यास सुरुवात केली. त्यातच हा सर्व प्रकार ललितच्या कुटुंबियांना आणि मित्रांना सांगत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकाराला वैतागून आपण आत्महत्या करीत असल्याचे ललित याने आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद करून ठेवले आहे. 

Translate »
error: Content is protected !!