तत्कालीन सचिव अरुण काळेच्या पोलीस कोठडीत वाढ ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

तत्कालीन सचिव अरुण काळेच्या पोलीस कोठडीत वाढ !


माहिती देत नसल्याने कोठडीत झाली वाढ !
नाशिक :  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा अपहार केल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक केली असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना चौकशीत सहकार्य करीत नसल्याने पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपासात सहकार्य करीत नसताना पोलिसांची सौम्य भूमिका का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

             याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश निवृत्ती घोलप, ५४, रा. प्लॉट नंबर २९५, गोकुळ नंद कॉलनी प्रशांत नगर पाथर्डी फाटा नाशिक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी सुनील विश्वनाथ जाधव याने १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार करून कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची फसवणूक करून आर्थिक नुकसान आणि विश्वासघात केल्या प्रकरणी एप्रिल २०२४ मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
             दरम्यानच्या काळात बाजार समिती प्रशासकांनी संशयित सुनील जाधव याच्या कडून पैसे वसूल करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत काळे याना आदेशित केले होते. मात्र, याकडे काळे यांनी दुर्लक्ष करून जाधव याला पाठीशी घालण्याचे काम केले होते. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायालयाने देखील काळे हे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांना आरोपी का केले नसल्याचे निर्देशित केले होते. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी अरुण काळे यांच्याविरोधात कारवाई करीत त्यांना मंगळवार दि. ३० रोजी अटक करत त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. सोमवार दि. ५ रोजी काळे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमोर उभे केले असता सरकारी पक्षाने काळे हे तपास आणि चौकशीकामी सहकार्य करीत नसल्याचा जोरदार युक्तिवाद करीत पुन्हा पोलीस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयाला विनंती केली असता न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत संशयित अरुण काळे यांना बुधवार दि. ७ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. 
फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे तपासात पोलिसांना सहकार्य करीत नसल्याने उच्च न्यायालयाने त्यांना सहआरोपी करण्यास सांगितले होते. त्यानंतर काळे यांना अटक करून सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर देखील पोलिसांना त्यांच्याकडून कुठलाच खुलासा मिळाला नाही. तसेच, त्यांनी तपास कार्यात सहकार्य केले नाही. त्यामुळे काळे यांना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलीस कसा तपास करणार आणि काय निष्पन्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, पोलीस कोठडी मिळाल्यानंतर देखील पंचवटी पोलीस काळे यांच्याबाबत सौम्य भूमिका का घेत आहे असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. 

Translate »
error: Content is protected !!