इमारतीवरून उडी घेत महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या !
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात ; पोलीस तपास सुरु !
नाशिक : इंदिरानगर परिसरातील साईनाथ नगर चौफुली जवळील एका इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत एका महाविद्यालयीन युवतीने आपली जीवनयात्रा संपवली आहे. तिने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कुठलाही खुलासा झाला नसून, इंदिरानगर पोलीस तपास करीत आहे. भर चौकात झालेल्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनम गुलमोहम्मद खाटीक, २२, रा. नूर बंगला, ममता नगर, अशोक मार्ग, नाशिक असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. अनम हिने साईनाथ नगर येथील प्रतिभा संकुल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता तिच्याकडे कॉलेजचे ओळखपत्र सापडले असून, त्यावरून तिची ओळख पटली आहे. अनम ही सध्या जे.एम.सी.टी. फार्मसी महाविद्यालयामध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. अनम ही सकाळी दहा वाजता कोणाला तरी भेटण्यासाठी आली होती. मात्र, त्यानंतर तिने दुपारी दोन वाजेच्या सुमारास आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली आहे. नेमकी ती कोणाला भेटण्यासाठी आली होती आणि आत्महत्या का केली याचा इंदिरानगर पोलीस शोध घेत आहे.





