पैसे चोरीला गेल्याने बस थेट पोलीस ठाण्यात ! - CHECKMATE NEWS
क्राईम

पैसे चोरीला गेल्याने बस थेट पोलीस ठाण्यात !


प्रवाशांना नाहक त्रास झाल्याने संताप !
नाशिक : बसमध्ये बसल्यानंतर आपल्याकडील ४० हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने बस थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आली. यावेळी पोलिसांनी बसमधील प्रवाशांची झडती घेतली. मात्र, कोणाकडेही पैसे सापडले नसल्याने बस मार्गस्थ करण्यात आली. यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात पैसे चोरीला गेल्याची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याचा नाहक त्रास बसमध्ये प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि महिला वर्गासह प्रवाशांना सहन करावा लागला.
           याबाबत अधिक माहिती अशी कि, गुरुवार दि. १८ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकरोड बस स्थानकातून बस क्रमांक एम. एच. १५ जी. व्ही. ७७१४ हि बस नाशिकरोड कडून दिंडोरीच्या दिशेने जाण्यास निघाली. बस हि पंचवटी कारंजा कडून दिंडोरी नाका येथे आली असता संगीता विष्णू बोंबले, ३९, रा. पिंपळगाव केतकी, ता. दिंडोरी, जि. नाशिक या बसमध्ये प्रवास करण्यासाठी बसल्या. यावेळी बसमध्ये चढण्यासाठी महिला आणि पुरुषांची गर्दी झाली होती. याचा गर्दीचा फायदा घेत अज्ञात संशयिताने त्यांच्या बॅगेतील ४० हजार रुपयांची रोकड लांबवली. काही क्षणात संगीता यांना आपल्या बॅगेतून ४० हजार रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी यावेळी आरडाओरड करून पैसे चोरीला गेल्याचे बस वाहक आणि चालक यांना सांगितले. चोरीचा मामला असल्याने आणि पंचवटी पोलीस ठाणे समोरच दिसत असल्याने बस चालकाने बस थेट पोलीस ठाण्यात आणून चोरीची माहिती पोलिसांना दिली.
             यावेळी पोलीस ठाण्यातील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी तात्काळ बसमधील प्रवाशांची झडती घेण्यास सुरुवात केली. तसेच, संपूर्ण बसची तपासणी केली. मात्र, पोलिसांना चोरीला गेलेले पैसे कुणाकडेही सापडले नाही. त्यामुळे काही वेळानंतर चौकशी आणि बसची तपासणी पूर्ण करून बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर संगीता बोंबले यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे मात्र, बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला

Translate »
error: Content is protected !!