पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर युवकाचा खून ! - CHECKMATE NEWS
क्राईम

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर युवकाचा खून !


वीस दिवसात खुनाच्या दुसऱ्या घटनेने पंचवटी हादरली !
नाशिक : पंचवटी कारंजा परिसरात रात्री साडेबारा एक वाजेच्या दरम्यान एका युवकाचा डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या खुनामुळे संपूर्ण पंचवटी परिसर हादरला आहे. वीस दिवसात दुसरा खून झाल्याने पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

             सोमवार दि. ९ रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या अतुल सूर्यवंशी नामक युवकाची नरोत्तम भवन समोर असलेल्या रस्त्यावर काही अज्ञात संशयितांनी डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. पंचवटी कारंजा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा खून करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

             युवकाच्या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला. तसेच, फॉरेन्सिक पथकाने याठिकाणी रक्ताचे नमुने घेत आजूबाजूला असलेले परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे. यावेळी पंचवटी कारंजाकडून मालेगाव स्टॅन्ड परिसराकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केल्याने नागरिकांमध्ये अनेक चर्चाना ऊत आला होता. 

Translate »
error: Content is protected !!