अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार ! - CHECKMATE NEWS
क्राईम

अल्पवयीन मुलाकडून चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार !


अल्पवयीन गुन्हेगारांच्या वयाबाबत कायद्यात बदल आवश्यक !

नाशिक : पंचवटी परिसरात एका बंगला मालकाच्या अल्पवयीन मुलीवर भाडेकरूच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद घटनेमुळे भाडेकरूंचा मुद्दा आणि अल्पवयीन गुन्हेगारांच्या वयाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

           पंचवटी परिसरात एका बंगला मालकाने आपल्या बंगल्याच्या आवारात पत्र्याचे शेड बांधलेले आहे. हे पत्र्याचे शेड एक वर्षांपासून एक महिला आणि तिचा १६ वर्षाचा अल्पवयीन मुलगा यांना भाड्याने दिलेले आहे. तसेच, या बंगल्यामध्ये फिर्यादी त्यांचे पती, सासू, सासरे आणि पावणे नऊ वर्षाची एक मुलगी राहत होती. नेहमीप्रमाणे शनिवार दि. ५ रोजी हि चिमुरडी बाहेर खेळून घरी आल्यानंतर रात्री अकरा वाजता आईला सू आणि शी च्या जागी दुखत असल्याचे सांगितले. यावेळी पीडित चिमुरडीच्या आईने मुलीने सांगितलेल्या ठिकाणी तेल लावण्यास गेली असता तिला शंका आल्याने तिने चिमुरडीला विश्वासात घेऊन विचारले असता. या मुलीने भाडेकरूच्या मुलाने केलेले घृणास्पद कृत्याची माहिती दिली. या संशयिताने या चिमुरडीसोबत यापूर्वी देखील असेच दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. 
            पीडित मुलीच्या आईने बदनामीच्या भीतीने पोलिसात तक्रार देण्यास टाळले. मात्र, असे दुष्कृत्य पुन्हा घडू नये या भीतीने पीडितेच्या आईने पंचवटी पोलीस ठाणे गाठून संशयित भाडेकरूच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या अत्याचार प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील करीत आहे. 
या अत्याचाराच्या घटनेमुळे भाडेकरूंचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. काही पैशांसाठी घरमालक भाडेकरूंची कुठलीही चौकशी न करता आपले घर भाड्याने देतात, तसेच, कायद्याने भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असताना देखील दिली जात नसल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 
अनेक अत्याचाराच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची दुर्दैवी घटना समोर येत आहे. अल्पवयीन असल्याने संशयिताला कायदयाची मदत मिळत असल्याने शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प झाल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या वयाबाबत कायद्यामध्ये तरतूद करून अल्पवयीन मुलांच्या वयाची व्याख्या कमी करायला हवी असल्याचे मत कायदे तज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण आज मितीला अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग उघड होत असून, ही मोठी चिंतेची बाब असल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. 

Translate »
error: Content is protected !!