बर्फाच्छादित "ॐ" झाला गायब ! - CHECKMATE NEWS
धार्मिकमहाराष्ट्र

बर्फाच्छादित “ॐ” झाला गायब !


ग्लोबल वॉर्मिग, पर्यटन, प्रदूषणामुळे वाढली चिंता !
नाशिक : हिंदू धर्मातील पवित्र स्थळांपैकी एक असलेले धार्मिक स्थळ ज्याठिकाणी प्रत्येक हिंदूला दर्शन करण्यासाठी जाण्याची इच्छा असते असे स्थळ म्हणजे आणि अमरनाथ यात्रा आणि “ॐ” पर्वत आहे. मात्र, यावर्षी प्रथमच संपूर्ण ओम पर्वतावरील बर्फाच्छादित संपूर्ण ॐ वितळला गेल्याने अक्षरशः गायब झाला आहे. यामुळे भाविकांमध्ये मोठी चिंता वाढली आहे. ऐन श्रावण महिन्यात ही घटना उघडकीस आल्याने अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. 
          दरवर्षी अमरनाथ येथे बर्फाचे शिवलिंग तयार होते. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. अशाच पवित्र स्थानांपैकी एक म्हणजे उत्तराखंड येथील पिठोरगढ जिल्ह्यातील ॐ पर्वत. चीनच्या सीमेलगत असलेल्या हिमालयातील पर्वत रांगांमध्ये लिपुलेख दरीजवळ असलेला ओम पर्वत. या पर्वतावर नैसर्गिकरित्या बर्फामुळे स्वयंभू ॐ  चे दर्शन होत असते. मात्र यावर्षी प्रथमच ओम पर्वतावरील संपूर्ण बर्फ नाहीसा झाला आहे. 
          वर्षभर ओम पर्वतावर कमी अधिक प्रमाणत बर्फ कायम असतो. वर्षभरात मे – जून महिन्यात या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांची खूप गर्दी असते. ओम पर्वताचे दर्शन घेऊन भाविक आणि पर्यटक समाधानी होत असतात. जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाळ्यादरम्यान पर्यटन पूर्णतः बंद असते. बर्फ कमी असला तरीही ॐ ची आकृती काही प्रमाणात दिसून येत असते. मात्र यावर्षी संपूर्ण पर्वतावर बर्फ नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ग्लोबल वॉर्मिग, पर्यटनासाठी बनविण्यात आलेले रस्ते, राहण्याच्या सुखसुविधा तसेच वाहनांची संख्या या कारणांमुळे वाढते प्रदूषण हे हिमालयासाठी आणि परिसरासाठी धोकादायक असल्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. या ग्लोबल वार्मिंगमुळे हिमालयातील हवामानावर आणि पर्यावणावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे हिमालयाच्या संवर्धनासाठी पाऊले उचलण्यात यावी अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ॐ पर्वत पिथोरगड जिल्ह्यापासून जवळपास पावणे दोनशे किलोमीटर असलेल्या नाभीढांग येथे आहे. या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या ॐ आकृती बघण्यासाठी लाखो भाविक येथे येतात. हा एक ईश्वरीय चमत्कार असून, ॐ आकृती तयार कशी होते याचे कोडे सर्वांनाच पडले आहे. मात्र, आजतागायत हे कोडे उलगडण्यात कोणालाही यश आलेले नाही.  

Translate »
error: Content is protected !!