खासगी सावकार कुंडलवाल पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल !
खासगी सावकारीचा नाशिकला विळखा !खासगी सावकार रोहित कुंडलवालकडून पिस्टल जप्त !मुख्य संशयित आरोपी खासगी सावकार कैलास कुंडलवाल फरार !सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते पुन्हा एकदा अडचणीत ?(खासगी सावकार कैलास कुंडलवाल आणि त्याचा मुलगा रोहित कुंडलवाल)
नाशिक : नाशिकमधील खासगी सावकार देवरे टोळीला मोक्का लावल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी पुन्हा एकदा एका खासगी सावकाराला जेरबंद केले आहे. बाप-लेकांनी मिळून अनेकांना व्याजाने पैसे देत त्यांच्याकडून वारेमाप पैसे वसूल केल्याचे समोर येत आहे. तसेच, यातील सावकाराने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटेनमुळे शहरात खासगी सावकारी किती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. हे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा सावकार मोठमोठ्या नेत्यांसोबत आपले फोटो काढून सोशल मीडियावर झळकावत त्याचा फायदा दहशत माजविण्यासाठी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सावकाराकडून पोलिसांनी आलिशान गाडीसह पिस्टल जप्त केले आहे. या खासगी सावकारांमुळे सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. ऐन विधानसभेचे अधिवेशन चालू असल्याने हा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाण्याची शक्यता आहे.
रोहित कुंडलवाल हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. तसेच, आपले संबंध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत असल्याचे दाखवत त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. तसेच, नाशिकमधील काही आजी-माजी आमदारांसोबत असलेले फोटो, विविध राजकीय व्यक्तींसह फोटो टाकलेले आहे. हे फोटो सावकारी करताना आणि परिसरात आपली दहशत पसरविण्यासाठी टाकले असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. या खासगी सावकारांमुळे सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. ऐन विधानसभेचे अधिवेशन चालू असल्याने हा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाण्याची शक्यता आहे.
खासगी सावकार कुंडलवाल बाप-बेट्यांनी अनेकांना अशा पद्धतीने व्याजाचे पैसे दिले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. व्याजाने पैसे दिलेले पैसे परत मिळाल्यानंतर देखील हि सावकारांची जोडी अवास्तव पैशांची मागणी करून त्यांना धमकी देण्याचे काम करीत असल्याचे देखिल पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे कुंडलवाल यांनी ज्याज्या नागरिकांना त्रास दिला आहे. त्यांनी पुढे येऊन गुन्हे दाखल करावे असे आवाहन भद्रकाली पोलिसांनी केले आहे. त्यामुळे भविष्यात देवरे दांपत्यानंतर कुंडलवाल बाप-लेकांवर मोक्कान्वये कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहे.





(खासगी सावकार कैलास कुंडलवाल आणि त्याचा मुलगा रोहित कुंडलवाल)