एटीएस विभागातील लाचखोर पोलीस नाईक याला अटक ! - CHECKMATE NEWS
क्राईममहाराष्ट्र

एटीएस विभागातील लाचखोर पोलीस नाईक याला अटक !


गोळीबारातील संशयिताला सोडून देण्यासाठी दीड लाखांची मागितली लाच !

नाशिक : दोन लाखांची लाच मागून दीड लाख स्वीकारणाऱ्या अहमदनगर येथील एटीएस विभागातील संदीप चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्याला नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबधक विभागाने अटक केली आहे. गोळीबाराच्या गुन्ह्यात अटक न करण्याबरोबरच ताब्यात घेतलेल्या तक्रारदाराच्या भावाला सोडून देण्याच्या मोबदल्यात लाच मागण्यात आली होती.
              याबाबत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या हाॅटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंग मध्ये झालेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी आणि भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी म्हणून संशयित संदीप चव्हाण, पोलीस नाईक तत्कालीन नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, अहमदनगर सध्या नेमणूक दहशतवाद विरोधी पथक अहमदनगर याने सोमवार दि. २२ रोजी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये दीड लाख रुपयांवर तडजोड होऊन ती स्वीकारण्याची तयारी संदीप चव्हाण याने दाखवताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
             अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर- घारगे, अपर अधीक्षक माधव रेड्डी, स्वप्नील राजपूत वाचक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, संदीप वनवे, ज्योती शार्दूल, परशराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर उप अधीक्षक प्रवीण लोखंडे करीत आहे.

Translate »
error: Content is protected !!