धक्कादायक अख्या कुटुंबाने संपवली जीवनयात्रा !
दांपत्याने केली मुलीसह आत्महत्या ; परिसरात एकच खळबळ !
नाशिक : इंदिरानगर परिसरातील वडाळा पाथर्डी रोडवरील राहणाऱ्या एका कुटुंबाने आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येच्या या घटनेमुळे परिसरात एकचखळबळ उडाली आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या कुटुंबाने आत्महत्या का केली याचा शोध घेत आहे

वडाळा पाथर्डी रोडवरील सराफ नगर येथील एका घरात पती पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या का केली याचे निश्चित कारण अद्याप पुढे आले नाही. शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
विजय माणिकराव सहाणे (४०) त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने (३६)आणि मुलगी अनन्या विजय सहाने असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहे. आर्थिक विवंचनेतून मुलीचा गळा आवळून त्यानंतर दांपत्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मयत हे कंपनी कामगार असल्याची माहिती आजूबाजूच्या रहिवाशांनी दिली आहे. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्नालयात पाठवले असून, पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहे.





