बांग्लादेशातील हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ नाशिक जिल्हा बंदची हाक !
सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा बंद आवाहन !
नाशिक : बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांवर होणाऱ्या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाने पाठिंबा जाहीर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अस्थिरतेचे वातावरण बनले आहे. आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातून पळ काढल्यानंतर संपूर्ण बांगलादेशी नागरिकांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार सुरु केला आहे. याचा मोठा फटका बांगलादेशात वास्तव्यास असणाऱ्या हिंदू कुटुंबियांना बसला आहे. बांगलादेशातून आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिसाचाराचे रुपांतर आता अराजकतेमध्ये झाले आहे. सरकार विरोधी आंदोलन हे आता हिदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. बांगलादेशात २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आले असून, जाणीव पूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिदुंच्या घरांवर आक्रमण करणे, हिदूंची दुकाने लुटणे, हिदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, हिदू महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. हिंदू नगरसेवकांची, हिंदू पत्रकाराची हत्या झाली. या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत.
याकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक येथील सकल हिदू समाजाच्या वतीने शुक्रवार दि. १६ रोजी नाशिक बंदची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी आपण आपले पद, पक्ष विसरून फक्त एक हिंदू म्हणून या आवाहनात सहभागी होवून पाठींबा द्यावा असे आवाहन सकल हिदू समाज, नाशिक जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे. या बंदला शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या आ. देवयानी फरांदे यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.





