हत्याप्रकरणात महिलेसह सात आरोपींना जन्मठेप ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

हत्याप्रकरणात महिलेसह सात आरोपींना जन्मठेप !


जून २०१८ साली करण्यात आली होती युवकाची हत्या !

नाशिक : पंचवटीतील पेठरोडवर असलेल्या तेलंगवाडी येथे २०१८ रोजी सकाळी एका महिलेसह सात संशयितांनी पंचवीस वर्षीय तरुणावर चॉपर,लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. सकाळी सकाळी झालेल्या या हत्येच्या घटनेमुळे पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली होती. या हत्याप्रकरणाचा निकाल लागला असून, यातील एका आरोपी महिलेसह सात आरोपीना जन्मठेपेसह तीस हजार रुपयांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. कौटुंबिक भांडणाच्या कारणातून ही हत्या झाली असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या घटनेत अनिल सुखलाल गुंजाळ (२५, रा. वैशालीनगर, पेठ रोड, पंचवटी) याची हत्या करण्यात आली होती. तर त्याच्या सोबत असलेला सागर संपत माने आणि दिपक गोराडे हे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत अनिल गुंजाळ व त्याच्या नात्यात मामा लागणारे संशयित जयराम नामदेव गायकवाड, श्रीराम नामदेव गायकवाड, सुरज जयराम गायकवाड आणि दशरथ नामदेव गायकवाड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. मंगळवार (दि. १२ जून २०१८) रोजी देखील रात्रीच्या सुमारास मयत अनिल गुंजाळ व संशयित गायकवाड यांच्यात मार्केट यार्डातील गाड्या लोड करण्यावरून वाद झाले होते. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात रात्री दोन्ही बाजूंकडील संशयितांविरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, बुधवार दि १३ जून २०१८ रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास पेठरोडवरील तेलंगवाडीतील लक्ष्मण जाधव सामाजिक कला, क्रीडा मित्रमंडळाच्या बोर्डाजवळ अनिल गुंजाळ, सागर माने आणि दिपक गोराडे हे बसलेले असताना त्यांच्यावर अचानक अंबिका अर्जुन पवार या संशयित आरोपी महिलेने मागील वादाच्या कारणातून अनिल गुंजाळ यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. आणि संशयित जयराम गायकवाड याने अनिलच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला तो खाली कोसळताच श्रीराम गायकवाड आणि सूरज गायकवाड यांनी त्याच्यावर चॉपरने वार करण्यास सुरुवात केली . तर दशरथ गायकवाड याने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालय, क्र. ८ जे. एम. दळवी यांच्या समोर सुरु होती. न्यायालयाने आरोपी विरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून हत्येतील आरोपी जयराम नामदेव गायकवाड, ४४, रा. लक्ष्मण नगर, गल्ली नं. ३, तेलंगवाडी, पेठरोड पंचवटी नाशिक, दशरथ नामदेव गायकवाड, २४, श्रीराम नामदेव गायकवाड, ३६, रा. सुरज जयराम गायकवाड, १९ अंबिका अर्जुन पवार, २८, सर्व रा. वैशाली नगर, रेशन दुकानाचे बाजुला पेठरोड पंचवटी नाशिक, संदिप चंद्रकांत पवार, २५, रा. विहिरीजवळ, अश्वमेधनगर, पवारचाळ, पेठरोड, नाशिक, राहूल चंद्रकांत पवार, १९, रा. देवळालीगांव बाजारपेटटी नाशिकरोड यांना जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ढमाळ यांनी केला आहे. खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून एस. एस. गोरवाडकर, व डॉ. सुधिर कोतवाल यांनी कामकाज पाहिले तसेच कोर्ट पैरवी अंमलदार, पोहवा मधुकर पिंगळे, मपो.हवा. एस. टी. बहीरम नेमणुक अभियोग कक्ष यांनी सदर गुन्हयात शिक्षा लागावी या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

 


Translate »
error: Content is protected !!