काझी गढीचा काही भाग कोसळला ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

काझी गढीचा काही भाग कोसळला !


दैव बलवत्तर म्हणून जिवित हानी टळली मात्र, घरांचे मोठे नुकसान !

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक झालेल्या काझी गढीचा काही भाग शनिवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. या दुर्घटनेमध्ये दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झालेली नसली तरी येथील काही घरांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा ढिसाळ कारभार याला जबाबदार असल्याचे संतप्त रहिवाशांनी सांगितले आहे. 

              जुन्या नाशिक परिसरात असलेल्या काझी गढीचा काही भाग सतत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवार दि. १४ रोजी दुपारी बारा  साडेबारा वाजेच्या दरम्यान ढासळल्या गेल्याने याठिकाणी असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोदावरी नदीच्या बाजूने असलेल्या टेकडीवरील घरे पावसाच्या संततधारेमुळे कोसळली आहे. यामध्ये दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी रहिवाशांची मोठी वित्तहानी झाली आहे. 
             येथील रहिवाशांना मनपाकडून दरवर्षी धोकादायक घरे म्हणून नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहे. तर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याठिकाणी संरक्षक भिंत उभारणीचे फक्त आश्वासन मिळत असल्याने येथील रहिवाशी आपला जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आता काझी गढी ढासळायला लागली असून, मनपा प्रशासनाणे यावर लवकरात लवकर पाऊले उचलून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवावे आणि त्यांचे स्थलांतर करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. 
            काझी गढीचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेत गर्दी केली होती. गढीवरून खाली रस्त्यावर घरांचे दगड विटा येऊन काही हानी होऊ नये यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उभे राहत वाहतुकीचे नियोजन केले. या दुर्घटनेनंतर देखील मनपाच्या अग्निशमन विभागाला याची कुठलीही माहिती नसल्याचे समोर आले आहे.

Translate »
error: Content is protected !!