सुरगाणा गटविकास अधिकारी दोन लाखांची लाच घेताना जाळ्यात ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

सुरगाणा गटविकास अधिकारी दोन लाखांची लाच घेताना जाळ्यात !


दोन लाख दहा हजार रुपये घेताना एसीबीने घेतले रंगेहात ताब्यात !
नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे थकीत २ कोटी ३२ लाख ३० हजार रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात २ लाख १० हजारांची लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे या विभागात एकच खळबळ उडाली आहे.
           तक्रारदार हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये पुरवठादार म्हणून काम करत असून, तक्रारदार यांचे २ कोटी ३२ लाख ३० हजार २७ रुपये बिल काढण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे २ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या आधारे मंगळवार दि. २५ रोजी पथकाने सापळा रचला असता तक्रारदार यांच्याकडून २ लाख १० हजार रुपये लाच स्वीकारताना सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश गोकुळ पोतदार रंगेहाथ पकडले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, किरण धुळे, पोलीस नाईक विलास निकम, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

Translate »
error: Content is protected !!