गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अंबड पोलीस रस्त्यावर ! - CHECKMATE NEWS
क्राईम

गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अंबड पोलीस रस्त्यावर !


३० मद्यपींवर कारवाई ; यापुढे दररोज सुरु राहणार कारवाई !
सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेली गुन्हेगारी, टवाळखोरी कमी करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहे. यामध्ये रस्त्यावर अंडा भुर्जींसह खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर मद्यपान करणाऱ्या मद्यपींना पोलिसांनी चांगला चोप दिला आहे. अचानक रस्त्यावर उतरलेले पोलीस पाहून अनेकांची झिंग उतरल्याचे दिसून आले. 
            अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मध्ये वाढ होत चालली आहे. घरफोडी, दुचाकी चोरी, जबरी लूट या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली वावरत होते. त्यात नुकताच नव्याने पदभार घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी हद्दीतील गुन्हेगारी आणि रस्त्यावरील टवाळखोरी मोडीत काढण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. शनिवार दि. १० रोजी रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक, महालक्ष्मी नगर आदी भागात रस्त्याच्या कडेला उघड्यावर तसेच चायनीज, अंडा भुर्जीच्या गाड्यांवर बिनधास्त मद्यपान करणाऱ्यांवर आपला दंडुका उगारला आहे. या कारवाई दरम्यान ३० मद्यपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 
             अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर मद्यपान करुण गोंधळ घालणे, टवाळखोरी करणे महिलांची छेड काढणे आदी प्रकारच्या तक्रारी अंबड पोलिसांना मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आले आहे. यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून रोडरोमिओ आणि मद्यपींना चांगलाच पोलिसी हिसका दाखवला. पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे आणि मद्यपिंचे चांगलेच धाबे दणाणले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर चौधरी, संजय पाटील, कुणाल राठोड, मयूर पवार, उमेश मानकर, राकेश राऊत, सागर जाधव, राहुल जगझाप, अरुण चव्हाण, अशोक शिरकांडे,  किरण देशमुख, रमेश पवार आदींनी केली आहे. 
पोलीस ठाण्यात काही नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर टवाळखोरी करणाऱ्या आणि चायनीज अंडा भुर्जींच्या गाड्यावर मद्यपान करणाऱ्या ३० मद्यपींवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई दररोज सुरु राहणार आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे टवाळखोरांना मद्य पिऊ देऊ नये. अन्यथा त्यांच्याविरोधात देखील कारवाई करण्यात येईल. : सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड पोलीस ठाणे

Translate »
error: Content is protected !!