शहरात महिलांना आंगण झाडणे झाले मुश्किल !
महिलांना घराबाहेर पडणे, रस्त्याने पायी चालणे, पार्किंगमध्ये उभे राहणे झाले मुश्किल !सोनसाखळी चोरांचा शहरात मोठ्या प्रमाणात उच्छाद !
नाशिक : नाशिक शहरात सामान्य महिलांना अंगणात काम करणे अथवा उभे राहणे देखील मुश्किल झाले आहे. सोनसाखळी चोर थेट पार्किंग आणि अंगणात येऊन महिलांच्या अंगावरील सोनसाखळी आणि सौभाग्याचे लेणे बळजबरीने खेचून घेऊन जाऊ लागले आहे. एखाद्या पिक्चरच्या कथानकाला शोभेल अशी गुन्हेगारी सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन सुस्त आणि कुंभकर्णाच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.
सध्या नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांच्या दहशतीमुळे महिलांना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे. सोनसाखळीच्या अनेक घटना घडून देखील नाशिक पोलिसांच्या हाती चोरट्यांचा कुठलाही सुगावा लागत नसल्याने नाशिककर पोलीस प्रशासनाच्या ढिम्म काराभाराविरोधात आपला संताप व्यक्त करीत आहे. पहिले महिलांना रस्त्यावर चालणे मुश्किल केल्यानंतर सोनसाखळी चोरटयांनी थेट महिलांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये घुसून सोनसाखळी चोरी करू लागले आहे. इतकेच नव्हे तर या सोनसाखळी चोरांचा इतका उच्छाद वाढला आहे आहे. कि, महिलांना आंगण झाडने देखील मुश्किल करून ठेवले आहे.
दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून पौर्णिमेला देवदिवाळी साजरी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. याच देव दिवाळीसाठी आंगण झाडने महिला वर्गाला महागात पडू लागले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या हौसाबाई धवळू बोरसे, ५२, रा. धात्रक फाटा, आडगाव शिवार या शुक्रवार दि. १५ रोजी संध्याकाळी पाच सव्वापाच वाजेच्या सुमारास देव दिवाळीनिमित्त घराचे आंगण झाडत होत्या. यावेळी अचानक एका काळ्या दुचाकीवरून दोन संशयितांनी येऊन हौसाबाई यांच्या गळ्यातील २९ ग्रॅम वजनाची आणि ९० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी घेऊन लोकमान्य हॉस्पिटलच्या दिशेने पळून गेले. याबाबत हौसाबाई बोरसे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोरट्यांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.
याचप्रमाणे फिर्यादी पूर्वा प्रशांत काटकर, ४४, रा. नरसिंह नगर, गंगापूर रोड या शुक्रवार दि. १५ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आकाशवाणी टॉवर जवळील भाजी मार्केटकडून घरी पायी जात असताना समोरून आलेल्या एका दुचाकीवरील अज्ञात दोघा संशयितांनी गळ्यातील ८ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी बळजबरीने तोडून फरार झाले आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोरांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहराची ओळख आता महिलांसाठी अत्यंत असुरक्षित शहर म्हणून होऊ पाहत आहे. दररोज शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात सोनसाखळी चोर महिलांना आपले लक्ष करीत आहे. त्याचप्रमाणे महामार्ग बस स्थानक, मेळा बस स्थानकासह ठक्कर बाजार बस स्थानकामध्ये अनेक महिलांच्या पर्समधील किंवा गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला जात आहे. असे असताना देखील पोलीस प्रशासनाकडून या चोऱ्या रोखण्यासाठी कुठलीही ठोस पाऊले उचलली जात नसल्याने नाशिककरांकडून पोलीस प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.





