रस्त्यात टाकलेल्या बॅरिकेट्स मुळे अपघाताची शक्यता ! - CHECKMATE NEWS
नाशिक

रस्त्यात टाकलेल्या बॅरिकेट्स मुळे अपघाताची शक्यता !


नादुरुस्त चेंबर झाकण्यासाठी मनपाचा ढिसाळ कारभार !
नाशिक : सिडको परिसरातील चेंबर खचल्याने त्यावर थेट पोलीस प्रशासनाचे लोखंडी बॅरिकेट्स ठेवण्यात आल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. परिसरातील नागरिकांनी याबाबत आपला संताप व्यक्त केला असून लवकरात लवकर चेंबर दुसर्स्ट करण्याची मागणी केली आहे. 
             सिडको परिसरातील उत्तम नगर या भागात रूंगठा मॉल समोर चार-पाच दिवसांपूर्वी चेंबर खचल्याने याठिकाणी चेंबर मध्ये कोणी पडून नये यासाठी थेट चेंबरवरती पोलीस प्रशासनाचे लोखंडी बॅरिकेट्स ठेवण्यात आले आहे. रस्त्याच्या मधोमध भले मोठे बॅरिकेट्स अडथळा आल्याने अनेक वाहनधारकांना रात्रीच्या वेळी आणि ओव्हरटेक करताना हे रस्त्यातील बॅरिकेट्स दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाला वाहनधारकांनी कळवुन देखील अद्याप पर्यंत त्या चेंबरची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनपा बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात वाहनधारक आणि परिसरातील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला असून, बांधकाम विभागाच्या वतीने त्वरित तुटलेल्या चेंबरचे दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

गेल्या चार ते पाच दिवसापासून सदर चेंबर तुटलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी चेंबरला झाकण्यासाठी भले मोठे लोखंडी बॅरिकेट आणून ठेवलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी बॅरॅकेट हे वाहन चालकांना दिसत नसल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने मोठ्या अपघाताची वाट न पाहता चेंबरची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. : अनिल चौधरी, वाहन चालक

Translate »
error: Content is protected !!