गुलमोहराचे झाड कोसळून वाहनाचे नुकसान ! - CHECKMATE NEWS
नाशिक

गुलमोहराचे झाड कोसळून वाहनाचे नुकसान !


सिडको : प्रभाग क्रमांक २८ मधील उपेंद्र नगर भागात शुक्रवारी सकाळी सहा वाजता गुलमोहराचे झाड अचानक कोसळल्याने यात एका मालवाहू टेम्पो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान काही सेकंदापूर्वी येथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन निघून गेल्याने मोठी दुर्घटना टळली. 

             याबाबत आधी वृत्त असे की, शुक्रवार दि. ९ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उपेंद्र नगर परिसरातील असलेल्या रिंकी संकुल येथे असलेला एक भला मोठा गुलमोहराचा वृक्ष अचानक कोसळला. यामध्ये विजय आहेर यांच्या मालकीचा टेम्पो क्रमांक एम. एच. १५ जे. सी. ८६४६ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आहेर यांनी दोन महिन्यापूर्वीच टेम्पो खरेदी केला होता. टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दैव बलवत्तर म्हणून यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते आबा पवार यांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत इलेक्ट्रिक कटरच्या साह्याने वृक्षाच्या फांद्या कट करून वृक्ष बाजूला केला वाहनधारकांना रस्ता मोकळा करून दिला. 

Translate »
error: Content is protected !!