कार्यकर्तेच आपले कुटुंबीय ; मी थकलो तसे ते ही थकले आहे !
आराम न करता ॲड. ढिकले कार्यकर्त्यांशी गप्पा मारण्यात रमले !
नाशिक : विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रचार करणे आणि मतदारांच्या गाठीभेटी घेणे यातच उमेदवारांचे दिवसरात्र एक झाले होते. एकदाची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडल्यानंतर सर्वांनी एकदाचा जणूकाही सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, मतदानानंतर पूर्व विधानसभा मतदार संघाचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांनी कुठेही कुटुंबियांसोबत विरंगुळा किंवा आराम करण्यासाठी न जाता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेत निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीसाठी आभार मानत त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात रमले असल्याचे दिसले. तसेच, कार्यकर्तेच आपले कुटुंबीय असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
बुधवार दि. २० रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानाची मतमोजणी शनिवार दि. २३ रोजी असल्याने उमेदवारांना आराम करण्यासाठी दोन दिवस मिळाले आहे. या दोन दिवसासाठी अनेक उमेदवारांनी आपल्या कुटूंबियांना घेऊन विरंगुळा आणि त्यांच्यासोबत वेळ घालण्यासाठी नाशिकपासून दूर गेल्याचे पुढे येत आहे. मात्र, पूर्व विधानसभेचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांनी नेहमीप्रमाणे गुरुवार दि. २१ रोजी सकाळी उठून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विविध चौकात जाऊन त्यांनी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना प्रचार आणि मतदानासाठी आलेल्या अडचणी जाणून घेतल्या. धावपळी नंतर आराम करण्याऐवजी ढिकले कार्यकर्त्यांची विचारपूस करीत असल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले.
ॲड.ढिकले यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्तेच आपले कुटुंबीय असल्याचे सांगितले. माझी जशी धावपळ सुरु होती. त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांची देखील धावपळ सुरु असल्याने त्यांची देखील दमछाक झाली असल्याने आपण आराम करावा आणि त्यांना वाऱ्यावर सोडावे अशी आपली मानसिकता नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शुक्रवारी देखील आपण कुठेही जाणार नसून दिवसभर कार्यकर्त्याच्याच संपर्कात राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ॲड. ढिकले यांनी आपला मतदार संघ सोडला नसल्याचे आणि कार्यकर्त्यांच्याच संपर्कात असल्याचे दिसून आले.





