प्राणघातक हल्ल्यातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू ! - CHECKMATE NEWS
क्राईम

प्राणघातक हल्ल्यातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू !


शहरात खुन आणि हाणामारीचे सत्र सुरुच !

नाशिक : शहरात गोळीबाराची घटना ताजी असताना पंचवटी परिसरात रविवारी एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच गंगापूर रोडवर सरकारवाडा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका युवकावर काही सराईत गुन्हेगारांनी सकाळी सकाळी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील जखमी युवकाचा उपचारादरम्यान दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस प्रशासना विरोधात नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

            याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे, २१, रा. घारपुरे घाट, अशोक स्तंभ, नाशिक हा मंगळवार दि. १ रोजी सकाळी गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळून पंडित कॉलनी परिसराकडे जात असताना संशयित अथर्व दाते याने त्याच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने आकाश गंभीर जखमी होऊन खाली पडताच संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती आकाशच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी आकाशाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी संशयितांना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर पथक पाठवले आहे. 

आकाश धनवटे व अथर्व दाते हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी आकाशने अथर्व याच्यावर हल्ला केला होता. त्याबाबत देखील पोलिसात गुन्हा दाखल असून, याच हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी अथर्व याने हा हल्ला केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आकाश हा वॉटर ग्रेस मध्ये स्वीपरचे काम करत होता. मंगळवारी सकाळी तो कामावर जात असताना ही घटना घडली. आकाश याला उपचारासाठी जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना दुपारी तीन वाजता आकाशचा मृत्यू झाला. आकाशचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला असता जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


Translate »
error: Content is protected !!