टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्सक्राफ्ट मान्सून स्कूटर रॅली शमीम खान विजेता ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्सक्राफ्ट मान्सून स्कूटर रॅली शमीम खान विजेता !


नाशिक – विशेष प्रतिनिधी  
नाशिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर रॅलीचा थरार डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. चिखलाचे रस्ते, साचलेले पाणी, दगड, माती यातून मार्ग काढताना स्पर्धकांची कसब पणाला लागली होती. ही स्पर्धा नासिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात खेळवण्यात आली होती. या टीव्हीएस एनटॉर्क स्पोर्ट्स क्राफ्ट मान्सून स्कूटर स्पर्धेत टीव्हीएस च्या शमीम खान (नाशिक) याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 
            फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एफएमएससीआय) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत एकूण ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता तर २९ स्पर्धक हि स्पर्धा पूर्ण करू शकले. केव्हज काउंटी रिसॉर्ट येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विजयी स्पर्धकांना सुरेश अण्णा पाटील, श्याम कोठारी, श्री व सौ शेवाळे, रुपेश चौधरी, टीव्हीएस रेसिंगचे विष्णू यांच्या हस्ते चषक व रोख स्वरूपाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख गणेश लोखंडे तसेच हर्षल कडभाने, सुरज कुटे, कौस्तुभ मत्से, अनिष नायर, आनंद बनसोडे, अमित बेलगावकर, अमित सूर्यवंशी, युवराज यादव, भूपिंदर सैनी, विक्रम राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
ग्रुप बी ८० सी सी ते ११५ सी. सी. – प्रथम निलेश ठाकरे, द्वितीय रोहन ठाकूर, तृतीय मोहंमद अन्वर 
ग्रुप बी ८० सी सी ते १६० सी. सी. – प्रथम मोहंमद अनिस  
ग्रुप बी महिला गट २१० सी. सी. – प्रथम पूजा खरे , द्वितीय गीता पाटील 
ग्रुप बी इलेक्ट्रिक गाडी – प्रथम अमर साठे , द्वितीय हितेश घाडगे , तृतीय अजित पाटील 
४८ वर्षावरील गट – प्रथम मोहंमद सईद, द्वितीय अमर साठे, तृतीय राजू मते 
ग्रुप बी २१० सी सी पर्यंत – प्रथम व्यंकटेश शेट्टी, द्वितीय मुजफ्फर अली, तृतीय तेजस कदम 
ग्रुप बी २१० सी. सी. ४ स्ट्रोक – प्रथम शमीम खान, द्वितीय कार्तिक एन, तृतीय देवेंद्र गुंजाळ
राजू मते यास प्रथम स्पर्धा खेळाडू म्हणून गौरवण्यात आले .

Translate »
error: Content is protected !!