पोलीस आणि गुन्हेगारांचे हितसंबंध पुन्हा एकदा अधोरेखित !
अवैध धंदे चालकासोबतच्या फोटोमुळे सर्वसामान्य नागरिक नाहक बदनाम !
नाशिक : ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतून शहरात अवैधरित्या दारू, गुटखा, गोवंश तस्करी अशा एक ना अनेक बेकायदेशीर गोष्टी सर्रास दाखल होत आहे. हे सर्व प्रकार ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांना माहित नाही असे म्हणणे थोडे धाडसाचे होईल. कारण त्यांच्या परवानगीशिवाय शहरात एकही बेकायदेशीर वस्तू येणे शक्य नाही. यासाठी तस्करी करणारे गुन्हेगार आणि खादीचे आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप नागरिकांकडून कायमच केले जातात. याला दुजोरा देखील मिळाला आहे. कारण वणी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकांचा वाढदिवस पोलीस कर्मचाऱ्यांनी नव्हे तर थेट काही अवैध धंदे चालकांनी साजरा केला आहे. तसेच, याचे फोटो व्हायरल करून खाकी आणि गुन्हेगारांचे हितसंबंध जगजाहीर करीत सामान्य नागरिकांवर एकप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरु झाली आहे. गावातील विविध क्षेत्रातील नागरिक केक कापून वाढदिवस साजरा करताना एक अवैध धंदे चालक हा अचानक आला. त्यामुळे फोटोमध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबत या अवैध धंदे चालकाचा फोटो प्रसारित झाल्याने उपस्थित नागरिकांना नाहक बदनामीच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
सेनापती प्रामाणिक असला तरी मोहीमेवर जाणारे सैन्य फंदफितूरीत अडकले तर प्रांत गमावण्याची वेळ येते. जिल्ह्यात विविध काळ्या धंद्याविरुद्ध पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने अतिरिक्त पोलीस अधिक्षक आदित्य मिरखेलकल, कळवण उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्यासारखे ग्रामीण पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी कर्तव्याशी प्रामाणिक आहे. मात्र, काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे अशा कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही मान खाली घालावी लागत आहे. वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलिस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच साजरा करावा, असा आदेश तत्कालिन नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिला होता.
नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना हा आदेश देण्यात आला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत काही मुजोर अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाण्यांमध्ये आणि कार्यालयात आपले वाढदिवस सार्वजनिक स्वरुपामध्ये साजरे करीत आहेत. हे वाढदिवस साजरे करताना बर्याच वेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा संशयित व्यक्ती, दारु, मटका व इतर अवैध धंदे करणारे, पोलिसांवर दबाव आणणारे इत्यादी लोकही सहभागी झालेले दिसून आले आहेत. त्याच प्रमाणे वणी पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे यांचा वाढदिवस वणी परिसरातील अवैध दारू तस्करांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये साजरा केला. इतकेच नाहीतर या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली जावून समाजामध्ये एक वेगळाच संदेश जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल व वाईट मत तयार होत आहे. फोटोमध्ये दारू तस्कराबरोबर सर्व सामान्य नागरिकही दिसत असल्याने त्यांनाही बदनामीला सामोरे जावे लागले आहे.
वणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विजय कोठावळे यांचा वाढदिवस अवैध दारू तस्करासोबत साजरा केल्याची बातमी काही प्रसार माध्यमांमधून प्रसारित होताच वरिष्ठांकडून विजय कोठावळे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. मात्र, प्रतिष्ठित शेतकरी रोशन मेधने, सरपंच जनार्दन वाघ, सचिन कड, माजी सैनिक हिरामण जाधव तसेच परिसरातील गावाचे पोलीस पाटील हे केक कापून वाढदिवस साजरा करताना संशयित सागर कापसे हा अचानक फोटोमध्ये आला. आणि तेच फोटो काही माध्यम प्रतिनिधींनी प्रसारित केले. यामुळे कारण नसताना उपस्थित असलेल्या प्रतिष्ठित नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. आम्ही साजरा केलेल्या वाढदिवसाचे आणि अवैध दारू विक्रेता सागर कापसे त्या फोटोमध्ये अचानक आल्यामुळे आम्हा सर्व प्रतिष्ठित नागरिकांना त्रास झाला. : रोशन मेधने, शेतकरी