उच्चभ्रू सोसायटीमधील कुंटणखाना उध्वस्त ; दोन पिडीत मुलींची सुटका ! - CHECKMATE NEWS
क्राईम

उच्चभ्रू सोसायटीमधील कुंटणखाना उध्वस्त ; दोन पिडीत मुलींची सुटका !


स्थानिक रहिवाशांचा आडगाव पोलीस ठाण्यात ठिय्या !
नाशिक : आडगाव परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेट मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने उध्वस्त केले आहे. यामध्ये एका महिलेला अटक करण्यात अली असून तिच्या ताब्यातून डोम महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच, एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, यातील संशयित महिलेने पुन्हा येथील रहिवाशांना दमदाटी करीत शिवीगाळ केल्या संतप्त रहिवाशांनी आडगाव पोलीस ठाणे गाठत महिलेवर कडक कारवाई करावी यासाठी काहीकाळ ठिय्या दिला. 
           याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि/ ४ रोजी पोहवा शेरखान पठाण व पोहवा गणेश वाघ यांना माहिती मिळाली होती. की, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला ही निर्माण नक्षत्र बिल्डींग, कपालेश्वर नगर, संभाजी नगर रोड येथे काही महिलांकडुन वेश्या व्यवसाय करून घेत आहे. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल पी.सी. बी.एम.ओ.बी-मध्यवर्ती गुन्हेशाखा यांच्या पथकाने सापळा रचून या महिलेच्या घरी बनावट ग्राहक पाठवला. यावेळी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची पुष्टि होताच छापा मारून कारवाई करण्यात आली.
           यावेळी अनैतिक देहव्यापार चालवणारी संशयित कविता साबळे-पाटील या महिलेला आणि जाफर मन्सुरीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, देह व्यापारासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका देखील पोलिसांनी केली आहे. संशयित हे आपल्या आर्थिक फायदयाकरीता मसाजच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करीत असल्याचे उघड झाले असून, त्यांच्याविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
             ही कारवाई पीसीबी एमओबी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अंचल मुदगल, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, उपनिरीक्षक पंडित अहिरे, मपोउनि वैशाली भाबड, सपोउनि नामदेव सोनवणे, पोहवा शेरखान पठाण, पोहवा गणेश वाघ, पोहवा समीर चंद्रमोरे, पोअंम प्रजीत ठाकुर, मपोना मनिषा जाधव, मपोशि वैशाली घरंटे, लता सुरसाळवे, स्नेहल सोनवणे, चालक सपोउनि विजय रायते यांनी केली आहे.
संशयित कविता साळवे-पाटील या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी करून रात्रीच्या सुमारास महिलेला अटक करता येत नसल्याने तिला घरी पाठविण्यात आले. मात्र, या संशयित महिलेने सोसायटी परिसरात येऊन चेअरमन आणि आजूबाजूच्या रहिवाशांना धमकावणे सुरु केले. माझे कोणी काही करू शकत नाही. आणि मी येथे पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक पद्धतीने धंदा करणार असल्याचे सांगत शिवीगाळ केली. यामुळे संतापलेल्या सोसायटी मधील महिलांनी गुरुवार दि. ५ रोजी सकाळी आडगाव पोलीस ठाण्यात येऊन अधिकाऱ्यांना घेराव घालत महिलेवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी यापुढे ही महिला सोसायटीमध्ये कुठलेही अनैतिक व्यापार करणार नाही याची ग्वाही दिली.
आडगाव पोलीस ठाण्यात बसून संशयित कविता साळवे- पाटील ही महिला सर्वांशी अरेरावी करीत असल्याने येथील रहिवाशांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जितेंद्र भावे यांच्याकडे मदत मागितली. यावेळी भावे आपल्या कार्यकर्त्यांसह आडगाव पोलीस ठाण्यात पोहचले. तसेच, निर्माण नक्षत्र या सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलांशी या अनैतिक कुंटणखाण्यामुळे येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी येथील महिलांनी घरातून बाहेर पडणे मुश्किल असल्याचे सांगितले. तसेच, याठिकाणी येणारे पुरुष मद्यपान आणि धूम्रपान करून सोसायटीमध्ये घाण करीत असल्याची माहिती दिली. यावेळी अनेक महिलांनी लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या घराशेजारी कुंटणखाना चालत असल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. तसेच, घराचा दरवाजा उघडा ठेवणे मुश्किल झाले असून, घरातील मुलींना बाहेर खेळायला देखील पाठवू शकत नसल्याची खंत व्यक्त केली. 
कुठलाही अवैध धंदा पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय सुरु होणे अशक्य बाब आहे. यासाठी पोलीस ठाण्यातील सुभेदार हे वसुलीसाठी ठेवलेले असतात. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूचा अक्षरशः दररोज महापूर वाहत असतो. या परिसरातील काही चांगली हॉटेल वगळता जवळपास सर्वच हॉटेल आणि ढाब्यांवर बेकायदेशीर दारू विक्री केली जाते. तसेच, ग्राहकांना पिण्यासाठी जागा करून दिली जाते. यातून मोठ्या प्रमाणात आडगाव पोलिसांना हप्ते मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील काही पोलीस  दैनंदिन काम सोडून फक्त वसुलीत दंग असल्याचे दिसून येतात. धार्मिक नगरीत पोलिसांच्या वरदहस्तामुळे अवैध धंदे वाढीला लागल्याने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Translate »
error: Content is protected !!