नराधम बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !
व्हिडीओ काढून आईला दाखवण्याची दिली धमकी !
नाशिक : बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना संतापजनक घटना उघडकीस आली आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नराधम पित्याने स्वत:च्या आठवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची लज्जास्पद आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईला मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ दिसल्याने या घटनेला वाचा फुटली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने आपल्या पतीविरुद्ध म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी हि २५ एप्रिल २०२४ रोजी बरे वाटत नसल्याने शाळेत गेली नव्हती. यावेळी तिची आई आणि आजी या दोघी काम करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. तर आजोबा आणि काका हे हॉस्पिटलमध्ये गेले होते. तसेच, पीडित मुलीचा भाऊ हा शाळेत गेला होता. त्यामुळे घरात पीडित अल्पवयीन मुलगी आणि दारुडा बापच घरात होते. यावेळी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पीडितेच्या नराधम बापाने जेवण करून घराचे दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या. आणि अल्पवयीन पीडित मुलीला हॉलमधील पलंगावर घेऊन गेले आणि आपण दोघे नवीन खेळ खेळू तू फक्त शांत रहा असे म्हणत आपल्या मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
हा नराधम इतक्यावरच थांबला नाहीतर त्याने मोबाईलमध्ये या सर्व विकृतीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत हा व्हिडीओ तुझ्या आईला दाखवेन असे सांगत पुन्हा अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तुला मारून टाकेन आणि हा व्हिडीओ तुझ्या आईला दाखवेन अशी धमकी दिली. तसेच, गुप्तांगातून रक्त आल्याबाबत कोणी विचारल्यास मासिक पाळी आल्याचे सांगण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने ही घटना घरातील कोणालाच सांगितली नाही.
दरम्यान पीडित मुलीच्या आईने मंगळवार दि. ६ रोजी रात्री साडेनऊ वाजता मोबाईल घेऊन त्यातील प्रायव्हेट सेफ नावाचे ॲप ओपन केले असता तिला त्यामध्ये आपल्या पतीचा आणि मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ दिसला. याबाबत पीडित मुलीला धीर देत तिच्याकडे विचारपूस केली असता पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. या घटनेने पीडितेच्या आईला चांगलाच धक्का बसला मात्र, तिने या प्रकाराला पाठीशी न घालता थेट म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले आले. नराधम पतीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच नराधम बाप फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी पीडितेच्या घराबाहेर सापळा रचून नराधम बाप येताच त्याच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेमुळे नराधम बापाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.





