दगडफेकीच्या घटनेमुळे जुन्या नाशिक परिसरात तणावपूर्ण शांतता !
पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण !बबलू परदेशी यांच्या घरावर हल्ला ; हल्ल्यात परदेशी जखमी !दगडफेकीमध्ये पोलीस उपायुक्तांसह पोलीस कर्मचारी जखमी !
नाशिक : बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागले असून शहरातील दूध बाजार परिसरात दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या तणावामुळे काही ठिकाणी दगडफेकीसह हल्ल्याचे प्रकार घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नागरिकांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहे. मात्र, दरम्यान वस्तुस्थिती हाताळण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगितली.

सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरातील विविध भागातून मोटार सायकल रॅली काढत व्यावसायिकांना दुकाने बंद करून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आंदोलन कर्त्यांकडून करण्यात येत होते. यावेळी रॅलीतील युवकांकडून जय श्रीराम, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात होत्या. शुक्रवार (दि.१६) रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अशीच एक मोटार सायकल रॅली पंचवटी परिसरातून मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, मेन रोडमार्गे दुध बाजार परिसरापर्यंत निघाली होती. या मोटार सायकल रॅलीच्या मागे पंचवटी परिसरातूनच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड तसेच पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे वाहन होते. सदरची रॅली हि दोन वाजेच्या सुमारास दुधबाजार परिसरात आली असता, यावेळी रॅलीतील युवकांनी परिसरातील उघडी असलेली दुकाने बंद करण्यास सांगत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आंदोलन कर्त्यांनी घोषणा दिल्याने यावर मुस्लीम समाजाच्या युवकांनी आक्षेप घेतला. यावेळी बोलाचाली सुरु असताना अचानक हाणामारी सुरु झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. यावेळी मुस्लिम युवकांकडून मोटार सायकल रॅलीत सहभागी झालेल्या चार ते पाच दुचाकी चालकांवर हल्ला चढवण्यात आला तर काही वाहनांची तोडफोड करण्यात आली.

दुधबाजार परिसरात आलेल्या मोटार सायकल रॅली चालकांवर व वाहनांवर हल्ला झाल्याचे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गर्दी पांगविण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही गट आक्रमक झाल्याने पोलिसांनी दोन्ही गट पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेची माहिती हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळताच गाडगे महाराज पुतळा परिसरात जमाव जमण्यास सुरुवात झाली. यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जमावाला समजावत तेथून काढून दिले. मात्र, याचा दरम्यान दुसरीकडे पिंपळ चौक येथे उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनावर काही अज्ञातांनी दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या.
तसेच, याच परिसरात भाजपचे पदाधिकारी बबलू परदेशी यांच्या घरावर हल्ला करत त्यांना व त्यांच्या भावाला गंभीर मारहाण करत जखमी केली. या हल्ल्यात बबलू परदेशी यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झाले होते. तर त्यांच्या घरावर लाठ्या काठ्यांनी आणि दगडाने हल्ला केल्याने बाहेर लावलेले फलक वस्तूंचे नुकसान झाले. पिंपळ चौक येथे आमदार देवयानी फरांदे यांचा लावण्यात आलेले होर्डिंग अज्ञात आंदोलनकर्त्यांनी लाठी काठीच्या सहाय्याने फाडले. यामुळे संपूर्ण परिसरात दगडांचा खच पडल्याचे दिसत होते.
तसेच, याच परिसरात भाजपचे पदाधिकारी बबलू परदेशी यांच्या घरावर हल्ला करत त्यांना व त्यांच्या भावाला गंभीर मारहाण करत जखमी केली. या हल्ल्यात बबलू परदेशी यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झाले होते. तर त्यांच्या घरावर लाठ्या काठ्यांनी आणि दगडाने हल्ला केल्याने बाहेर लावलेले फलक वस्तूंचे नुकसान झाले. पिंपळ चौक येथे आमदार देवयानी फरांदे यांचा लावण्यात आलेले होर्डिंग अज्ञात आंदोलनकर्त्यांनी लाठी काठीच्या सहाय्याने फाडले. यामुळे संपूर्ण परिसरात दगडांचा खच पडल्याचे दिसत होते. दुसरीकडे पोलीस मेनरोड, गाडगे महाराज चौक, दुधबाजार, सीबीएस परिसरात शांतता राखण्याचे काम करत असताना सायंकाळी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान जुन्या नाशिक येथील बडी दर्गा भागात घरांच्या गच्चीवरून तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी दगड आणि रिकाम्या काचेच्या बाटल्या पोलिसांच्या दिशेने फेकण्यात आल्या होत्या. म्हसरूळ टेक भागात झालेल्या दगडफेकीत अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. यावेळी पोलिसांकडून जमाव पसरविण्यासाठी दोन अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले.
बडी दर्गा भागातील दगडफेकीत पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांना उजव्या कानाला दगड लागल्याने जखमी झाले असून एक दगड त्यांच्या बरगडीला लागल्याने त्यांना दुखापत झाली आहे. तर आंदोलकांसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना दगड लागल्याने ते जखमी झाले आहे.
मोटार सायकल रॅलीला परवानगी नसताना देखील ती निघाली होती. या रॅलीच्या मागे असलेले पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी जर त्या रॅलीला वेळीच रोखले असते तर शहराची शांतता भंग झाली नसती. विशेष म्हणजे शहरातील विविध भागातून तरुणांचे जत्थेच्या जत्थे जुन्या नाशिकमध्ये दाखल होत असताना त्यांना रोखण्यासाठी कुठेही पोलीस रस्त्यावर नव्हते का असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
पोलीस आयुक्त याकडेही लक्ष द्या…. : म्हसरूळ टेक भागात घराच्या दरवाजात उभ्या असलेल्या महिलांना भद्रकाली पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. यावेळी संतप्त महिलांनी घराबाहेर येऊन पोलिसांच्या वर्तवणुकीबद्दल आपला संताप व्यक्त केला.
पोलीस आयुक्तालयाकडून जुन्या नाशिक परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तसेच कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.: संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त





: संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त