पंचवटीतील मतदार ढिकले यांच्या पाठीशी – कच्छ कडवा समाज
राहुल ढिकले यांच्याकडून विविध समाज बांधवांच्या भेटीगाठी सुरु !
नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांनी आपल्या प्रचार दौऱ्याची सुरुवात प्राचीन जागृत देवस्थान श्री बळी मंदिर येथे दर्शन घेऊन केली. यावेळी परिसरातील भाविक आणि मतदारांच्या भेटी घेतल्या. नंतर प्रभाग २० मध्ये पाटीदार भवन येथे कच्छ कडवा समाज यांच्या स्नेह मिलन मेळाव्यास भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला, यावेळी सर्वांनी आमदार ढिकले यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
या दौऱ्याप्रसंगी माजी जेष्ठ नगरसेवक अरुण पवार यांनी आमदार ढिकले यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामाचा पाढा वाचला. त्यानंतर दुपारच्या सत्रात प्रभाग क्रमांक तीन मधील तपोवन परिसरातील स्वामी नारायण मंदिर येथे अन्नकोट या कार्यक्रमास भेट दिली. त्यानंतर पुढे रासबिहारी रोड, सिध्दीविनायक टाऊन शिप, गणेश नगर, अंबाजी नगर, मंडलिक मळा, ओंकारेश्वर कॉलनी, सिद्धेश्वर नगर, शिवकृपा नगर, एसएसडी नगर या भागातील मतदारांच्या भेटी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रचार दौऱ्यात माजी नगरसेवक सुरेश खेताडे, सुनील सूर्यवंशी, माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, भाजप मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, माजी नगरसेविका प्रियंका माने, भाजप शहर उपाध्यक्ष धंनजय माने, शाम पिंपरकर, राहुल मुखेडकर, सौरभ सोनवणे, अमृतभाई पोकार, राजू ससाणे, नयन शेजवळ, समाधान शेवाळे, अमोल बैरागी, अविनाश भाटे, राहुल गोवर्धने, कौशिक ढिकले, मनीष शेजवळ, राहुल क्षीरसागर, रूपेश लासुरे, मयुर तांबे यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.





