भविष्यात शाश्वत विकास करण्यासाठी ढिकले यांना पुन्हा निवडून आणणार - सूर्यकांत लवटे - CHECKMATE NEWS
राजकीय

भविष्यात शाश्वत विकास करण्यासाठी ढिकले यांना पुन्हा निवडून आणणार – सूर्यकांत लवटे


नाशिक : नाशिक पूर्व विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आ. राहुल ढिकले यांनी मंगळवारी नाशिकरोड भागातील प्रभाग २० आणि २१ या भागात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. परिसरातील जय भवानी रोड, कमला पार्क, कदम डेअरी, जगताप मळा, लवटे नगर १, वास्तु पार्क, सावता माळी स्टीलच्या मागे, गायकवाड मळा, औटे मळा, गाडेकर मळा या भागात प्रचार दौरा केला आणि मतदारांशी संवाद साधत मतदानाचे आवाहन केले. 
           या प्रचार दौऱ्या दरम्यान सूर्यकांत लवटे यांनी नाशिकरोड परिसराचा ढिकले यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवल्या असल्याचे सांगितले. तसेच, भविष्यात ६०० बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याने याचा मोठा फायदा नागरिकांना होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य नागरिकांना फिरण्यासाठी अद्यावत उद्यानांची निर्मिती केली. त्यामुळे नागरिकांना विरंगुळ्याचे आणि एकमेकांशी निवांत बसून संवाद साधण्यासाठी हक्काच्या निर्माण केल्याबद्दल आभार मानले. तसेच, भविष्यातील विकास करण्यासाठी मितभाषी असलेल्या राहुल ढिकले यांना मोठ्या मताधिक्क्याने पुन्हा निवडून देणार असल्याचे यावेळी लवटे आणि परिसरातील नागरिकांनी सांगितले. 
            यावेळी माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, हेमंत गायकवाड, राम कदम, अंबादास पगारे, रमेश धोंगडे, सुर्यकांत लवटे, कोमल महेरोलिया संतोष झाल्टे, विनोद यादव, ॲड. कदम, दीपक लोणकर, फकीरराव कदम, वामनराव कदम, दिलीप कदम, संजय कदम, गणेश खांडरे, रमेश लवटे, अनिल लवटे, विजय कदम, अंकुश कदम, राहुल लवटे, अनिल व्यवहारे, मंगेश पगार, शरद जगताप, मंगेश रोजेकर, धनंजय लवटे, अर्जुन लवटे, विजय देशमुख, जयंत जाचक, बाळासाहेब भगत, निखिल पारचे, दीपक भगत, वैभव वाळेकर, पंकज सोनवणे, विशाल जानवडे, गौरव घुगे, गौरव डफाळ, पुनीत कांकरिया, आतिष भोसले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Translate »
error: Content is protected !!