घरातच साकारले अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर ! - CHECKMATE NEWS
धार्मिक

घरातच साकारले अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर !


पुठ्ठे, लाकूड आणि कागदाचा वापर करून इकोफ्रेंडली राममंदिराची उभारणी !
नाशिक : पंचवटी परिसरात राहणाऱ्या सिव्हिल इंजिनिअर यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरातच अयोध्या येथील भव्य राममंदिर उभारले आहे. हे मंदिर संपूर्ण इकोफ्रेंडली बनविण्यात आले आहे. तसेच, मंदिरात भाविकांना दर्शनासाठी रामल्लांची मूर्ती देखील ठेवण्यात आली आहे. या भव्य राममंदिराचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील रहिवाशांसह शहरातील भाविकांनी गर्दी केली आहे. या परिवाराकडून आलेल्या गणेशभक्तांचे स्वागत जात आहे. 
          गणेशोत्सावात भक्त आपल्या बाप्पांसाठी अनेक प्रकारचे असे वैविध्यपूर्ण आरास बनविण्यासाठी महिना दीड महिन्यांपासून तयारीला लागत असतात. यामध्ये मंदिर, गडकिल्ले, मंदिरे, निसर्ग, पर्यावरण, नदी, नाले, ब्रह्मांड असे एकनाअनेक विषय घेऊन भाविक आरास उभारणीसाठी दिवसरात्र एक करीत असतात. यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ आणि इकोफ्रेंडली देखावे तयार करण्याकडे मोठा कल असल्याचे दिसून येत असते. आपल्या बाप्पांसाठी सामान्य नागरिकांसह डॉक्टर, इंजिनियर, प्राचार्य, शिक्षक, व्यावसायिक, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते असे सर्वच भाविक तन, मन धनाने कामाला लागलेले असतात. 
           पंचवटी परिसरातील बळी मंदिर चौकातील पार्कसाइड होम्स येथे राहणारे सिव्हिल इंजिनिअर सुनील जयराम खापरे यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरात इकोफ्रेंडली अशी साडेसहा फूट बाय पाच फूट बाय पाच फुटाची भव्य अयोध्येतील श्रीराममंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. सुनिल खापरे हे स्वतः राम भक्त आहे. यासाठी त्यांनी पॅकिंग पुठ्ठा, कागद आणि लाकुड याचा वापर केला आहे. तयार करण्यात आलेल्या मंदिरामध्ये रामलल्लाची नऊ इंचाची सुबक मूर्ती गर्भगृहात विराजमान करून श्रीराम दर्शनाची संधी परिसरातील नागरिकांना आणि भाविकांना उपलब्ध करून दिली असून, नाशिककरांनी देखील या श्रीराम मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनिल खापरे यांच्या परिवारातर्फे करण्यात आले आहे. तसेच, सुनिल आणि पूजा खापरे यांनी युट्युबर आणि रील स्टार यांना देखील रिल बनविण्यासाठी निमंत्रित केले आहे. 
श्रीराम मंदिर बनविण्यासाठी खापरे यांना जवळपास महिना लागला आहे. यासाठी सर्वप्रथम त्यांनी अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटवरून ड्रॉइंग काढले आणि ते हिंसामध्ये कन्व्हर्ट करून त्याचा फ्लोअर प्लॅन तयार केला. २५ ऑगस्टला माझा फ्लॉवर प्लांट तयार झाला. त्यानंतर डी मार्ट मध्ये जाऊन वेस्टेज असलेले पुठ्ठे आणून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. या श्रीराम मंदिर तयार करण्यासाठी सुनील खापरे यांना पत्नी पूजा खापरे, मुलगा स्मित खापरे, मुलगी स्पंदन खापरे आणि मावस बहीण सोनाली जाधव बोरसे यांनी मदत केली. दररोज दिवसभर आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत काम करण्यात येत होते. या मंदिर उभारणीसाठी पाईन लाकडाचे एक इंच बाय एक इंचाचे जवळपास १७५ फुट लांब बाॅटम वापरण्यात आले आहे. तसेच, डी मार्ट आणि मेट्रो मॉलमधून पुठ्ठे आणण्यात आले होते. 

Translate »
error: Content is protected !!