पत्रकार संघाच्या प्रदेश सदस्यपदी लक्ष्मण डोळस यांची निवड ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

पत्रकार संघाच्या प्रदेश सदस्यपदी लक्ष्मण डोळस यांची निवड !


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी जाहीर !
नाशिक : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली असून नवीन प्रदेशकार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात पत्रकार संघाचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डोळस यांची प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड करण्यात आली.
          महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नुकतीच पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे होते. तर कार्यक्रमाच्या प्रमुख व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव यादी उपस्थित होते. यावेळी संघटनात्मक बळकटीसाठी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदी गोविंद वाकडे तर प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी लक्ष्मण डोळस यांची निवड करण्यात आली. 
          नाशिक जिल्हाध्यक्षपदी काम करत असताना पत्रकारांच्या विविध समस्या मार्गी लावल्या असून कोरोना काळात पत्रकारांसाठी विशेष कार्य केल्यामुळे प्रदेश कार्यकारिणीने माझ्यावरती हा विश्वास दाखवला आहे. आगामी काळात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचे काम मी राज्यभर करेल. तसेच, जास्तीत जास्त पत्रकार प्रशिक्षण शिबिर घेण्याचा मानस असल्याचे निवडीनंतर लक्ष्मण डोळस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी पत्रकार लक्ष्मण डोळस यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Translate »
error: Content is protected !!