हत्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

हत्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !


हत्या घडवून आणल्याप्रकरणी व्यंकटेश मोरेविरोधात गुन्हा दाखल !

नाशिक : गंगापूर रोडवरील युवकाच्या हत्याप्रकरणात मुख्य संशयित म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, भाजप पक्षाच्या देखील अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणामुळे नाशिकच्या राजकारणातील गुन्हेगारांचा वाढता सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणी अजूनही काही राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे. यामध्ये अजून कोणत्या राजकीय नेत्याचा समावेश होणार का याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अशा प्रकारे पडद्याआडून हत्या सारख्या घटना घडवून आणणाऱ्या राजकीय नेत्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरु झाली आहे. 

           आकाश उर्फ शिवम संतोष धनवटे, २२, रा. गोदावरी नगर, घारपुरे घाट, अशोक स्तंभ, नाशिक हा मंगळवार दि. १ रोजी सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकाजवळील पंडित कॉलनीतील बाल गणेश मंदिराकडे जात असताना संशयित अथर्व दाते, रितेश साळुंखे अभय तुरे आणि त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांसोबत येऊन आकाश धनवटे याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करीत त्याची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. 
            या हत्याप्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी (माथाडी सेल) शहराध्यक्ष संशयित व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख यांच्या सांगण्यावरून संशयित अथर्व दाते, रितेश साळुंखे अभय तुरे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित अथर्व अजय दाते, २०, रा. घारपुरे घाट, अभय विजय तुरे, १९, रा. हेमलता टॉकीज रविवार पेठ आणि एका बालगुन्हेगाराला अटक केली आहे. असून, यातील मुख्य संशयित हे फरार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
मयत आकाश धनवटे याला यापूर्वी देखील संशयितांनी जुन्या भांडणाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आणि न्यायालयात साक्ष न देण्यासाठी धमकावले असल्याबाबत मयताचा भाऊ मकरंद उर्फ सोमा संतोष धनवटे, २०, रा. गोदावरी नगर, घारपुरे घाट, नाशिक यांने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आपले राजकीय भवितव्य उजळ करण्यासाठी थेट नागरिकांचा जीव घेतला जात असल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे. याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करू नये यासाठी मोठा दबाव आणला गेला असल्याची चर्चा रंगली आहे. 

Translate »
error: Content is protected !!