द लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन करणार पत्रकारितेचा यथार्थ सन्मान !
पत्रकार दिनाच्या अभूतपूर्व सोहळ्याची जय्यत तयारी !
नाशिक : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात असतो. या औचित्यावर सोमवार दि. ६ जानेवारी रोजी प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक द लँड एम्पायर यांच्या तर्फे नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्वच माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांचा यथार्थ सन्मान करण्यासाठी अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त द लँड एम्पायरच्या वतीने पत्रकारांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी वाहतूक व्यवस्था आणि समस्या या विषयावर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या शंभरहून अधिक नामांकनातून निवड समिती ही विजयी प्रवेशिकांची नावे जाहीर करून त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पुरस्कार स्वरूप : या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार ५०० रुपये, तृतीय ५ हजार रुपये आणि या शिवाय २ हजार ५०० रुपयांचे दोन उत्तेजनार्थ असे पाच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सोमवार दि. ६ रोजी सकाळी ९ वाजता करी लिव्हज, जेहान सर्कल, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी संपन्न होणाऱ्या या पत्रकार सन्मान सोहळ्यासाठी जिल्हा भरातून तीनशेहुन अधिक पत्रकार उपस्थित राहणार असून उपस्थित प्रत्येक पत्रकारचा यथार्थ सन्मान करण्याचे प्रयोजन असल्याचे द लँड एम्पायरचे मुख्य प्रवर्तक मंदार वाईकर यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार आणि अनेकांना पत्रकारितेचे प्रात्यक्षिक वारसा म्हणून दिलेले मधुकर बुवा हे अध्यक्ष म्हणून लाभले असून
नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमा हिरे, जेष्ठ विधिज्ञ बार कौन्सील ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. जयंत जायभावे, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच या सोहळ्यासाठी सर्वच माध्यमातील पत्रकारांना खुले निमंत्रण असल्याची माहिती द लँड एम्पायरच्या संचालिका नम्रता वेदिया यांनी दिली.





