दाम करी काम, वासना बनली हैवान ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

दाम करी काम, वासना बनली हैवान !


माऊलीच्या विकृती समोर लेकुरवाळी दीन !
नाशिक : राम राम जय श्रीराम अशी आरोळी ठोकून खरोखर रामराज्य निर्माण होईल का? जिथे जिथे प्रभू रामचंद्राचा सहवास लाभला. तिथे तिथे भलेही सहवासाचे अवशेष शिल्लक असतील. पण प्रभू रामचंद्राच्या विचारांचा आणि आचारांचाही लवलेश तरी शिल्लक उरला आहे का? असे प्रश्न विचारण्याची सदबुद्धी सुचण्याचेही कारणतही “राम” आहे. कारण भविष्यात उघड होणारी ही संतापजनक घटना कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून सत्यात उतरवल्यास सेवेकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडणार यात काही शंका नाही. 
             एक पत्नी व्रत जपणाऱ्या प्रभू रामाच्या सहवासाने पुनीत झालेल्या रामनगरीत स्त्री दाक्षिण्य अक्षरशः पैशांच्या मुजोरीने लिलावात काढले आहे. अध्यात्माच्या बुरख्या आडून महिलांच्या अब्रूला हात घालून तिला देशोधडीला लावण्याचे पाप माऊलीच्या वेषातले हैवान करीत असताना, व्यवस्थाही या बाजारात सौदागर म्हणून निर्लज्जपणे सहभागी होत असेल तर भिऊ नकोस, मी पाठीशी आहे असा धीर अबलेला कुठल्या तोंडाने द्यायचा? आणि समाजही षंडपणे हे सारे पाहून शांत बसणार असेल तर राम रहीम, आसारामच्या पिलावळी माता भगिनींच्या अब्रुचे धिंडवडे काढतांना तसुभरही मागे हटणार नाहीत. जिथे समाजच षंड होतो तिथे कलियुगात एखादा कृष्ण धावून येईल, द्रौपदीची इज्जत वाचविल अशी अपेक्षा बाळगणे मुर्खाच्या नंदनवनात जगण्यासारखे आहे.
           काही दिवसापूर्वीची ही कथा आहे. रामनगरीत आपल्या मुलीसारख्या अनुयायी महिलेचा येथेच्छ उपभोग घेऊन, तिलाच देशोधडीला लावण्याचे पाप एका अध्यात्मिक गुरूने केले. जेंव्हा हे संबंध व्हायरल होऊ लागले. तेंव्हा साम दाम दंड भेद या अस्रांचा वापर करून तिचे तोंड बंद करण्याचे षडयंत्र राबवले गेले. या कारस्थानात ज्यांनी दीन दुबळ्या, अबलांचे रक्षण करायचे, त्या व्यवस्थेनेही या पाप्यांना अर्थपूर्ण साथ दिली. विकृत प्रवृत्तीने स्वतः मौजमजा करून थकल्यानंतर आपल्याच आश्रमातील एका गुलामाला पुढे करून त्या अबलेला खंडणीच्या गुन्ह्यात पद्धतशीरपणे अडकवले. कृष्ण म्हणून या अबला द्रौपदीच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे कर्तव्य बजावण्या ऐवजी व्यवस्थेनेही याच नराधम प्रवृत्तीच्या षडयंत्राला पूर्णत्वास नेले. यात अनेकांनी आपले हात धुवून, उखळ पांढरे करून घेतले. वास्तविक हे षडयंत्र पूर्णत्वास नेण्याआधीच काही महिने या अबलेने व्यवस्थेकडे न्यायाची याचना केली होती. ती फाट्यावर मारून व्यवस्थेनेही आर्थिक समीकरणे जुळवून या अबलेचाच बळी दिला. लाडक्या बहिणीची अब्रू वाचवण्यासाठी हात पुढे सरसावण्या ऐवजी त्याच हातानी हे घोर पाप होते, त्यालाच राम राज्य म्हणायचे का?
या कथेकडे केवळ करमणूक म्हणून पहावे… या कथेतील वर्णनाशी कुणाला कुणाविषयी काही साम्य आढळल्यास तो दुग्ध शर्करा योग समजावा…….!!!! क्रमशः 

Translate »
error: Content is protected !!