द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चौदा लाखांची फसवणूक ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चौदा लाखांची फसवणूक !


लासलगाव पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल !
शिरवाडे वाकद : निफाड तालुक्यातील खडक माळेगाव आणि मरळगोई खुर्द येथील शेतकऱ्यांची द्राक्ष निर्यातदाराने जवळपास १४ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मध्यस्थ आणि निर्यातदार यांच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               याबाबत ज्ञानेश्वर वाळु रायते, ४७, रा.खडक माळेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्या शेतामध्ये पाच वर्षांपूर्वी द्राक्ष लागवड केली होती. दि.५ जानेवारी २४ रोजी संशयित व्यापारी पुर्वा अनिल चव्हाण, रा.औद्योगिक वसाहत, महर्षीनगर पुणे, सुरज भिमराव कांबळे, रा. गणेश दर्शन क्र.३ आपटेवाडी बदलापुर इस्ट, वामसी कृष्णा गाजीथला, रा.तिरुपती, आंध्रप्रदेश, तेजल अनिल चव्हाण, औद्योगिक वसाहत, पुणे मार्केट यार्ड यांनी द्राक्ष पाहणी केली होती. यावेळी तेजल चव्हाण यांनी द्राक्ष खरेदीस अनुकूलता दर्शवली होती. शेतकरी दतात्रय भाऊसाहेब कोकणे, बापु अशोक रायते यांच्या समक्ष सर्व व्यवहार चेक व बाकी रोखीने करु असे सांगुन बागेचा ७३ व ५२ रुपये प्रतिकिलोने भाव ठरविण्यात आला होता. 
         त्यानंतर संशयित आरोपींना दि. १५ जानेवारी ते दि. २१ फेब्रुवारी याकाळात एक्सपोर्ट युनायटेड फ्रेश इंडिया द्राक्ष कंपनीने शेतातील ७ लाख ६५ हजार ८०३ रुपयांचे द्राक्ष घेऊन गेले होते. त्यापैकी ५० हजार बँकेत जमा करून उर्वरित ७ लाख १५ हजार ७७३ रुपयांचा पूर्वा चव्हाण यांची सही असलेला धनादेश दिला. मात्र, हा धनादेश जून महिन्यात बँकेत टाकल्यांनंतर पैसे नसल्याने वटला नाही. तसेच, बापु अशोक रायते रा. खडकमाळेगाव यांच्या द्राक्ष बागेच्या एकूण ३, लाख ८१ हजार ५४१ आणि मरळगोई खु. ता. निफाड येथील छबु महादु फापाळे यांचे ३ लाख ३५ हजर ८११ द्राक्ष खरेदी केले. मात्र, त्यांना एक रुपया देखील मिळाला नाही. या शेतकऱ्यांनी ओझर शिवारातील दहाव्या मैलावरील कार्यालय गाठले असता तेही बंद आढळून आले. त्यामुळे या शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी संशयित आरोपी पूर्वा चव्हाण, सूरज कांबळे यांनी वामसी कृष्णा गाजीथला आणि अनिल चव्हाण यांच्या मदतीने आमचा द्राक्ष माल खरेदी करुन आमची १४ लाख ३३ हजार १२५ रुपयांची माझी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणुक करुन विश्वास घात केला आहे म्हणुन गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Translate »
error: Content is protected !!