ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार करत टाकला दरोडा ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार करत टाकला दरोडा !


घटनेचा व्हिडिओ पाहण्यासाठी चेकमेट न्यूजच्या युट्युबला भेट द्या !
नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर परिसरात असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात अज्ञात तिघा संशयित आरोपींनी हवेत गोळीबार करीत दरोडा टाकला आहे. हा सर्व थरार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून, संशयितांनी रोख रक्कम आणि दागिने घेऊन पोबारा केला आहे. पोलीस या संशयितांचा शोध घेत आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
          याबाबत अधिक माहिती अशी की, नवी मुंबईतील खारघर सेक्टर ३० येथील बी. एम. ज्वेलर्सवर रविवार दि. २८ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात तीन संशयितांनी दरोडा टाकला. डोक्यात हेल्मेट आणि अंगावर रेनकोट घालून आलेल्या दरोडेखोरांनी दुकानात घुसताच हवेत गोळीबार करीत दुकानातील कर्मचाऱ्यांना धमकावले. तसेच, मोबाईल फोन घेत दुकानातील रोख रक्कम काढून देण्यास भाग पाडले. यावेळी या दरोडेखोरांनी दुकानातील दागिने घेत दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
             ज्वेलर्सच्या दुकानात दरोडेखोर घुसल्याबाबत बाहेर उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करत घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसेच, दुकानात सुरु असलेला थरार आणि दरोडेखोर पळून जात असतानाचा व्हिडीओ नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. त्यामुळे या व्हिडिओचा पोलीस तपासात नक्कीच उपयोग होऊन दरोडेखोर गजाआड होतील असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

Translate »
error: Content is protected !!