रस्त्याने धावणाऱ्या कारवर क्रेन कोसळल्याने कारचा चक्काचूर ! - CHECKMATE NEWS
नाशिक

रस्त्याने धावणाऱ्या कारवर क्रेन कोसळल्याने कारचा चक्काचूर !


दैव बलवत्तर म्हणून कारचालक बचावला !
नाशिक : तारवाला नगर सिग्नलकडून कमलनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर क्रेन चालकाने अचानक वळण घेतल्याने क्रेनचा हूक रस्त्याने जाणाऱ्या कंटेनरला अडकल्याने क्रेन ट्रक बरोबर खेचली गेल्याने मागून येणाऱ्या चारचाकी कारवर कोसळल्याने भीषण अपघात झाला. या मध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. आजूबाजूच्या नागरिकांनी मदत करत गाडीत अडकलेल्या चालकाला बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          शुक्रवार दि. २ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मोहन आनंदराव चव्हाण, ५४, रा. समृद्धी कॉलनी, दिंडोरी रोड हे आपल्या एम. एच. १५ इ. पी. ४३९२ या चारचाकी वाहनाने तारवाला सिग्नलकडून अमृतधामकडे जात होते. यावेळी त्यांच्या गाडी पुढे हायड्रा क्रेन क्रमांक एम.एच. ०४ डी. टी. ०८०१ हा चालला होता. यावेळी हायड्रा क्रेन चालकाने अचानक कमलनगरकडे जाण्यासाठी वळण घेतले. याचवेळी रस्त्याने जाणारा कंटेनर क्रमांक एम. एच. १८ बी. ए. ९४३९ याला हायड्रा क्रेनचा बुमचा हुक अडकला आणि हायड्रा क्रेन कंटेनर बरोबर खेचला गेल्याने क्रेन थेट मागून येणाऱ्या मोहन चव्हाण यांच्या कारवर कोसळली. यामुळे संपूर्ण कार क्रेन खाली दबल्या गेली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून मोहन चव्हाण यांना काहीही इजा झाली नाही. 
            हा अपघात बघून आजीबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या मोहन चव्हाण यांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली होती. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात क्रेन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Translate »
error: Content is protected !!