अल्पवयीन संशयिता सोबत रिक्षा चोरी !
मुख्य संशयित आरोपीचा शोध सुरु !
नाशिक : शहरात बालगुन्हेगारांचा गुन्ह्यांमधील वाढता सहभाग पोलिसांची डोकेदुखी ठरू लागला आहे. मोटार सायकल चोरी डिटेक्शन पथकाने एका संशयिताला त्याच्या विधिसंघर्षित बालकासह रिक्षा चोरीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. बालगुन्हेगारांच्या समावेशामुळे पोलिसांपुढे तपासादरम्यान मोठ्या अडचणी उभ्या राहत आहे. यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बालगुन्हेगारीवर आळा बसण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकातील पो.ना. रविंद्र दिघे यांना रिक्षा चोरीतील संशयीत आरोपी रवि शंकर मार्ग, वडाळा जॉगींग ट्रॅक, नाशिक या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवार दि. ५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपला साथीदार संशयित आरोपी नामे तौफिक शहा, रा. लिली व्हाईट स्कुल जवळ, वडाळा गाव, नाशिक हा असल्याचे सांगितले. या संशयिताच्या ताब्यातून एम. एच. १५ ए. के. ५१४६ हि रिक्षा जप्त केली असून संशयित आरोपी तौफिक शहा याचा पोलीस शोध घेत आहे.
ही कारवाई विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, उपनियरिक्षक मुक्तेश्वर लाड, पो.ना. योगेश चव्हाण, रविंद्र दिघे, चकोर, मंगेश जगझाप, पो. अं. भगवान जाधव, गणेश वडजे व मपोहवा. मंगला जगताप, सविता कदम, पोना. अरुण परदेशी, मुश्रीफ शेख, योगेश जाधव यांनी केली आहे.





