काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त जागा लढण्याच्या तयारीत रहा – ब्रिज किशोर दत्त
नाशिक – विशेष प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या तयारीला लागा, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व शहर जिल्ह्याचे प्रभारी ब्रिज किशोर दत्त यांनी केले.

विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागून नाशिक शहरातील विधानसभा मतदारसंघासाठी भूत पासून तयारीला लागावे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आपापल्या ब्लॉक मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून बूथ यंत्रणा मजबूत करण्याकरता प्रयत्न करावे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार येत्या १५ ऑगस्ट पर्यंत शहरातील सर्व बुथ कमिट्या तयार करून पक्षाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्याकरता कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे अशा सूचना मंगळवार दि. २३ रोजी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रभारी ब्रिज किशोर दत यांनी दिल्या. पुढच्या आठवड्यात सर्व ब्लॉक काँग्रेसच्या बैठकांचा आयोजन करण्यात येणार असून सर्व आघाडी व विभागांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहे असे याप्रसंगी ब्रिज किशोर दत यांनी सांगितले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिरीष कोतवाल होते. स्वागत प्रास्ताविकामध्ये शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आगामी काळात भूत पासून तर शहरापर्यंत व जिल्हापर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता तन-मन-धनाने काम करून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देईल असे सांगितले.
बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी आगामी काळातील कार्यक्रमांची नियोजन नियोजनबद्ध व्हावे तसेच केंद्र व राज्य सरकारने ज्या पद्धतीने शेतकरी कामगार विद्यार्थी विरोधी जे कामकाज केले आहे ते जनमानसापर्यंत पोहोचून जनमानसांच्या प्रश्नांची वाचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी फोडली पाहिजे तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाची ताकद दाखवून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला सन्मानाची जागा मिळेल असा विश्वास शिरीष कोतवाल यांनी याप्रसंगी व्यक्त केला लवकरच देश पातळीवर राज्य पातळीचे काँग्रेसचे नेते नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार असून काँग्रेस पक्ष मजबुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये उतरेल असेही कोतवाल यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपत सकाळे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, प्रदेश सचिव रमेश कानडोळे, यशवंत पाटील, राजेंद्र बागुल, हनीफ बशीर, उल्हास सातभाई, सिराज कोकणी, नाशिक शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, नाशिक जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष अल्तमश शेख, भारत टाकेकर, सुनील आव्हाड, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव पानगव्हाणे, वत्सला खैरे, आशा तडवी, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना पाटील, जयेश पोकळे, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, माजी सभागृहनेते सुभाष देवरे, मुस्ताक शेख, बबलू खैरे, विजय पाटील, उद्धव पवार, आणा मोरे, राजकुमार जेफ़, संतोष ठाकूर, गौरव सोनार, ज्ञानेश्वर काळे, भालचंद्र पाटिल, जावेद इब्राहिम, हिसाक कुरेशी, कुसुम चव्हाण, अरुणा आहेर, समीना पठान, गुड़ी खान, सोफ़िया सिदिकी, वृंदा शेरे, प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड,रमेश कहांडोळे, भास्कर गुंजाळ, यशवंत अहिरे,यशवंत पाटील, शिवाजी कासव,संपतराव वक्ते, सुजाता बच्छाव, ज्ञानेश्वर काळे, लकी जाधव, गौरव पानगव्हाणे, जयेश पोकळे, सुनील आव्हाड, विनायक सांगळे, समीर देशमुख, प्रकाश पिंगळ, केदा सोनवणे, दर्शन आहेर, संजय जाधव, हरेश्वर सुर्वे, विजय जाधव, सखाराम भोये, दिनकर निकम, नाझीम शेख, प्रशांत बाविस्कर, शरद खैरनार, प्रकाश खळे, रश्मी पालवे, किशोर कदम, उत्तम ठोंबरे, सचिन होळकर, गुणवंत होळकर, नामदेव राऊत, बाळासाहेब कुकडे, हिरामण गायकर, अंबादास ढिकले, सोमनाथ मोहिते, बाळासाहेब कासार, अब्दुल कोकणी, उमाकांत गवळी, भिमराव जेजुरी,अरुण गायकर, सिद्धार्थ संसारे, चंद्रकांत भोये, मुजाहीर खतीब, पांडू शिंदे, बाळासाहेब वालझडे, प्रीतम पटणी, बाळासाहेब मांजरे, दिलीप शिंदे, स्वप्निल सावंत, दिलीप आहेर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





