आडगावकरांनी केला ठराव या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्याचा ! - CHECKMATE NEWS
राजकीय

आडगावकरांनी केला ठराव या नेत्याच्या पाठीशी उभे राहण्याचा !


नाशिक : आडगाव येथील प्रचार कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी समस्त आडगावकरांनी आ. ॲड. राहुल ढिकले यांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठराव केला. यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ आडगावच्या मुख्य चौकात जमल्याने याठिकाणी सभेचे चित्र उभे राहिले होते. आडगावकरांनी केलेल्या या एकमुखी ठरावामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन चांगलीच सरकली आहे. यावेळी आडगावकर धनशक्तीच्या पाठीमागे न जाता विकासाच्या पाठीमागे जाणारी असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. 

           नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आडगाव येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी आडगावच्या महिला भगिनींनी ढिकले यांचे औक्षण करून त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले. तसेच, यावेळी आडगावच्या मुख्य चौकात संपूर्ण आडगावच्या पंचक्रोशीतील जमलेल्या शेतकरी बांधवानी ढिकले यांच्या उमेदवारीला एकमुखाने पाठिंबा दिला. यावेळी भिकाजी पाटील शिंदे यांनी ॲड. राहुल ढिकले यांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठराव मांडला. यावेळी जमलेल्या सर्व आडगाव ग्रामस्थ, सर्व जाती धर्माच्या मतदारांनी आणि लहान मोठं खुळं या सर्वांनी हात वर करून या ठरावाला अनुमोदन देत मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.  
            यावेळी माजी नगरसेवक उद्धव निमसे, सुरेश खेताडे, शीतल माळोदे, पूनम सोनवणे, पुंजाभाई माळोदे भिकाजी शिंदे, दामु शिंदे, संतोष भोर, उत्तम मते, युवराज झोमान, रामदास नवले, अभय माळोदे, गणेश माळोदे, सतीश माळोदे, डॉ अशोक भोर, शांताराम गायकवाड, नामदेव शिंदे, कैलास शिंदे, जालिंदर शिंदे, तुकाराम लभडे, प्रभाकर मते, सनी माळोदे, प्रभाकर माळोदे, बाजीराव लभडे, निलेश म्हस्के, निवृत्ती शिंदे, बाजीराव माळोदे, संदीप लभडे, भाऊसाहेब शिंदे, कृष्णा राऊत, भाऊसाहेब लभडे, विष्णु हळदे, एकनाथ तपकीरे, संजय शिंदे, विठोबा माळोदे, बाळू सोनवणे, दिनकर लभडे, नितीन माळोदे, भिवसेन लभडे, विठ्ठल देशमुख, प्रभाकर भोर, दौलत शिंदे, दत्तू शिंदे, सुरेश मते, सुरेश होडोरे, शिवाजी साठे, मधुकर जाधव, सुनील झोमान, चंद्रशेखर लभडे, राम संधान, सागर माळोदे, उत्तम दिवटे, उत्तम जोंधळे, सागर खांदवे, भाऊसाहेब ढिकले, अंबादास ढिकले, शंकर जाधव, विलास जाधव, महेंद्र जाधव, दिपक कदम, मंगेश भडांगे, सुभाष कदम, लक्ष्मण म्हस्के, दिनकर कदम, मधुकर कदम, गणेश कदम, राहुल कदम, तानाजी लभडे, शिवाजी म्हस्के, माणिक गाडे, पोपट कदम, भाऊसाहेब मते, दौलत कदम, रामभाऊ कदम, दशरथ कदम, दत्ता शिंदे, सागर मते, मयुर मते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Translate »
error: Content is protected !!