ढिकले यांच्या विजयासाठी चिमुकल्यांच्या व्हायरल पत्राची चर्चा !
नाशिक : नाशिक पुर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांना प्रचारा दरम्यान मतदार संघातील बाल मित्राकडून विजयी शुभेच्छा देणारे पत्र ठरते चर्चेचा विषय. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांसह लहान लहान बाल गोपाळांमध्ये देखील ढिकलेंची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या पत्राच्या आशयावरून लहान मुले देखील ढिकलेंच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होतांना दिसत आहे. विकासकामे आणि न झालेला विकास यावर निवडणूक काळात राजकीय चिखल फेक होईल यात शंका नाही. मात्र, मतदारसंघातील जय भवानी रोडवरील लवटे नगर परिसरात राहणारे श्लोक लवटे आणि तन्वी लवटे यांनी ॲड. ढिकले हे प्रचार करत असताना त्यांची भेट घेतली. लवटे भाऊ बहिणींनी ढिकले यांना एक पत्र दिले. दरवर्षी आमच्या सारख्या बालगोपालांना न विसरता वाढदिवसानिमित्त भेटकार्ड आणि गिफ्ट देतात. आम्ही मतदान करू शकत नसलो तरी, आमच्या घरच्यांचे तसेच परिसरात मतदान जनजागृती करू आपणास विजयी करण्यासाठी मदत करू अशा आशयाचा मजकूर त्या व्हायरल पत्रावर बालगोपालांकडून लिहिण्यात आला. सध्या हे पत्र नाशिकमध्ये चांगलेच व्हायरल होत असून, यातून ढिकले यांना वाढता पाठिंबा मतदारांकडून मिळत असल्याचे दिसत आहे.
नाशिक पुर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांना प्रचारा दरम्यान मतदार संघातील मतदारांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यामध्ये विशेष करून महिला वर्गाचा वाढता पाठिंबा वाखाणण्याजोगा आहे. ढिकले ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहे. त्या त्यात परिसरातील महिला ढिकले यांचे औक्षण करून आपण लाडकी बहीण असल्याची दाखवून देत आहे. तसेच, ढिकले यांचा प्रचार करण्यासाठी महिला आघाडी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत असल्याने ढिकले यांना त्यांचा प्रचार करताना मोठी मदत मिळत आहे.





