मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा जास्त लीड देऊ : तानाजी पिंगळे - CHECKMATE NEWS
राजकीय

मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा जास्त लीड देऊ : तानाजी पिंगळे


गोरक्षनगर आणि मखमलाबाद येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन !
नाशिक : आमदार ॲड. राहुल ढिकले यांना मखमलाबाद ग्रामस्थांनी १५ वर्षापूर्वीच ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांना गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा जास्त लीड देऊन त्यांना पुन्हा आमदार करू असे आश्वासन सेंट्रल गोदावरी संस्थेचे संचालक तानाजी पिंगळे यांनी केले. मखमलाबाद येथील ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
              यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तानाजी पिंगळे, संपत पिंगळे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मखमलाबाद गाव आणि परिसरातून रॅली काढण्यात आली. तानाजी पिंगळे, शंकरराव पिंगळे, सुनील केदार, वाळू काकड, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, माजी नगरसेविका सुनिता पिंगळे, रमेश काकड, मदन पिंगळे, गणपत काकड, भास्कर पिंगळे, संजय गामणे, राका माळी, अजित ताडगे, माजी नगरसेवक उद्धव निमसे, नारायणराव काकड, धनंजय खोडे, शिवाजी काकड, उत्तम उगले, संतू काकड, बाळासाहेब पिंगळे, गणेश पिंगळे, ज्ञानेश्वर काकड, राजेश पिंगळे, प्रभाकर पिंगळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते 
       यावेळी सुभाष तिडके यांनी आ. राहुल ढिकले यांचा भावी आमदार अन् मंत्री असा उल्लेख करून ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेऊन ढिकले यांना विधानसभेत पुन्हा पाठवा असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर सरचिटणीस शंकरराव पिंगळे पूर्व विधानसभा मतदारसंघाला सुसंस्कृत असे नेतृत्व मिळाले आहे. पंचवटी ही प्रभू श्रीरामाची भूमी असून नाशिकचे नाव आज आ. राहुल ढिकले यांनी देशात उज्वल केले आहे. त्यामुळे यावेळी मखमलाबाद गावातून आघाडी देऊ असे सांगितले. उद्धव निमसे यांनी एका बाजूला शेतकरी हित जपणारा माणूस अन् दुसऱ्या बाजूला शेतकरी विरोधी माणूस आहे. विरोधी उमेदवाराने केवळ ठराविक बिल्डरचाच विकास केला असू केवळ बिल्डर धर्जिण्या व्यक्तीला निवडून देणार का असा प्रश्न उपस्थित करत पुन्हा ढिकले यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन केले. 
भारतीय जनता पक्षाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचाराची सुरुवात प्रविण जाधव यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक एक मधील सर्व सहकाऱ्यांसह गोरक्षनगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयापासून केली. यावेळी प्रविण जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, गेल्या पाच वर्षात राहुल ढिकले यांनी केलेल्या विविध कामाच्या जोरावर, मतदारांनी त्यांना निवडून द्यायचे आवाहन केले. यावेळी ढिकले यांचा सत्कार परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना राहुल ढिकले यांनी गेल्या पाच वर्षात त्यांच्या मार्फत केल्या गेलेल्या विविध कामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला आणि भविष्यात सुद्धा विविध विकासकामे करण्यासाठी, येत्या २० तारखेला मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे अशी विनंती केली. यावेळी मेरी – म्हसरूळ परिसरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Translate »
error: Content is protected !!