रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा ! - CHECKMATE NEWS
नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा !


नाशिक : विविध स्तरांवर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नासिक या संस्थेच्या सन २०२४-२५ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी निश्चीत करण्यात आली आहे. या नुंतर कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा हा रविवारी होणार आहे. 
             पदग्रहण सोहळा रविवार दि. २१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गंगापूर रोड येथील के.बी.टी.कॉलेजच्या सभागृहात पार पडणार आहे. नूतन कार्यकारिणी मध्ये ओमप्रकाश रावत (अध्यक्ष), शिल्पा पारख (सेक्रेटरी-ॲडमिन), हेमराज राजपूत (सेक्रेटरी-प्रोजेक्ट) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून यांचा शपथविधी सोहळा रोटरी क्लबचे विद्यमान डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रजिंदर खुराणा यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तसेच सदर पदग्रहण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर या देखील उपस्थित राहणार आहेत.
           या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी इतरही नवीन नियुक्ती झालेल्या रोटरी सभासदांचा शपथविधी होणार आहे. पदग्रहण सोहळ्याप्रसंगी जास्तीत जास्त रोटरी सभासद तसेच हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सन २०२३-२४ चे अध्यक्ष मंगेश अपशंकर, सचिव डॉ. गौरव सामनेरकर, प्रोजेक्ट सचिव हेमराज राजपूत तसेच सर्व रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे. 

Translate »
error: Content is protected !!