भाविकांची बस घाटात कोसळून भीषण अपघात !
गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात खासगी बस पलटी !बस अपघातामध्ये पाच भाविक मृत्यूमुखी तर ४५ प्रवासी जखमी !
नाशिक : वणी -बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात रविवार दि. २ रोजी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्यातून देवदर्शन आटोपून गुजरात राज्यात जाणाऱ्या खासगी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने खासगी बस क्रमांक यु.पी. ९२ ए.टी. ०३६४ पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर बसमधील ४५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेश येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली महाराष्ट्रातील नाशिक येथून देवदर्शन आटोपून गुजरातच्या दिशेने निघाली होती. मात्र, रविवारी पहाटे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात बस पलटी झाली. या अपघातामध्ये बसमधील रतनलाल देविराम जातव (४१), बोलाराम पोसाराम कुसवा (५५), गुहीबेन राजेशभाई यादव (६०), बिजेंद्र बादल यादव (५५), कमलेश भाई यादव (६०, सर्व राहणार मध्यप्रदेश) यां भाविकांचा मृत्यू झाला आहे. बसमधील जखमी २१ भाविकांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर २४ गंभीर जखमी भाविकांना अहावा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





